May 21, 2025 3:42 PM

views 21

पूजा खेडकरला अटकपूर्व जामीन मंजूर

माजी सनदी प्रशिक्षणार्थी पूजा खेडकरला आज सर्वोच्च न्यायालयानं अटकपूर्व जामीन मंजूर केला. पूजा खेडकर तपास यंत्रणांना सहकार्य करत नसल्याचा आणि तिच्यावर असलेले आरोप गंभीर स्वरूपाचे असल्याचा राज्य सरकारचा युक्तिवाद न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना आणि न्यायमूर्ती सतीश चंद्र शर्मा यांच्या पीठानं फेटाळून लावला.

February 14, 2025 3:21 PM

views 14

वादग्रस्त पूजा खेडकरला १७ मार्चपर्यंत दिलासा

बनावट प्रमाणपत्र देऊन आरक्षणाचा लाभ घेतल्या प्रकरणी आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकरला सर्वोच्च न्यायालयाने येत्या १७ मार्चपर्यंत दिलासा दिला आहे. या काळात तपासाला सहकार्य द्यावं असं न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना आणि न्यायमूर्ती सतीश चंद्र शर्मा  यांच्या पीठाने बजावलं आहे. पूजा खेडकरच्या जामीन अर्जाबाबत जबाब दाखल करायला सरकारी वकिलांनी आणखी मुदत मागितली, तेव्हा येत्या ३ आठवड्यात जबाब दाखल करावा असं न्यायालयाने सांगितलं.   दरम्यान, या प्रकरणी चौकशीसाठी पूजा खेडकरला पोलिसांनी अद्याप बोलावलेलं...

August 21, 2024 1:25 PM

views 20

पूजा खेडकरला २९ ऑगस्टपर्यंत अटक न करण्याचे दिल्ली उच्च न्यायालयाचे आदेश

महाराष्ट्रातील निलंबित प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर हिला येत्या २९ ऑगस्टपर्यंत अटक करण्यात येऊ नये, असा आदेश दिल्ली उच्च न्यायालयानं दिले आहेत. न्यायालयाच्या या निर्णयामुळे पूजा खेडकर हिला मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २९ ऑगस्टला होईल, असा न्यायमूर्ती सुब्रमण्यम प्रसाद यांनी यावेळी नमूद केलं.   दिल्ली उच्च न्यायालयात आज झालेल्या सुनावणीवेळी यूपीएससीनं सादर केलेला जबाब आपल्याला कालच मिळाला आहे. त्यामुळे त्याला उत्तर देण्यासाठी मुदत द्यावी, अशी मागणी पूजा खेडकर हिच्या ...

August 1, 2024 7:37 PM

views 13

पूजा खेडकर यांचा अटकपूर्व जामीन दिल्ली न्यायालयाने फेटाळला

नागरी सेवा परीक्षेच्या अर्जात खोटी माहिती दिल्याप्रकरणी माजी प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकर यांचा अटकपूर्व जामीन दिल्ली न्यायालयाने आज फेटाळला.   केंद्रीय लोकसेवा आयोगानं खेडकर यांची नियुक्ती रद्द करण्याचा निर्णय काल दिला. तसंच भविष्यात कोणतीही प्रशासकीय सेवा परीक्षा देण्यावर त्यांच्यावर बंदी घातली आहे.

July 31, 2024 7:13 PM

views 13

वादग्रस्त परिविक्षाधीन सनदी अधिकारी पूजा खेडकर यांची नियुक्ती केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून रद्द

भारतीय प्रशासकीय सेवेतल्या वादग्रस्त परिविक्षाधीन अधिकारी पूजा खेडकर यांची नियुक्ती केंद्रीय लोकसेवा आयोगाने रद्द केली आहे. तसंच पुन्हा कोणतीही प्रशासकीय सेवा परीक्षा देण्यावर कायमची बंदी घातली आहे. परिविक्षाधीन कालावधीत अवाजवी मागण्या केल्याचा, तसंच दिव्यांगत्वाचं खोटं प्रमाणपत्र सादर करुन आरक्षणाचा लाभ उकळल्याचा, तसंच नागरी प्रशासकीय सेवा परीक्षेच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप खेडकर यांच्यावर आहे. या संदर्भात आयोगाने बजावलेल्या नोटिशीला उत्तर देण्यासाठी खेडकर यांना आज दुपारी साडेतीन पर्यंत...

July 19, 2024 3:49 PM

views 14

केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून पूजा खेडकर विरोधात खटला दाखल

वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या विरोधात केंद्रीय लोकसेवा आयोगाने खटला दाखल केला आहे. परीक्षेच्या नियमांचं उल्लंघन करत पूजा खेडकर यांनी स्वतःचं, वडिलांचं आणि आईचं नाव बदललं.तसंच फोटो, स्वाक्षरी, ईमेल आयडी, मोबाईल नंबरसह पत्ता बदलून आपली खोटी ओळख दाखवल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवला आहे. तसंच केंद्रीय लोकसेवा आयोगाची उमेदवारी रद्द करण्यासाठी कारणे दाखवा नोटीसदेखील जारी केली आहे.   दरम्यान, पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्यावर छळाचे आरोप केल्या संदर्भात पूजा खेडकर...