August 12, 2024 3:42 PM
13
पूजा खेडकर यांना २१ ऑगस्टपर्यंत अटक न करण्याचे दिल्ली उच्च न्यायालयाचे आदेश
बडतर्फ प्रशासकीय अधिकारी पूजा खेडकर यांना २१ ऑगस्टपर्यंत अटक न करण्याचे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्ली पोलिसांना दिले आहेत. नागरी सेवा परीक्षा फसवणूक करून उत्तीर्ण झाल्याचा आरोप करत दिल्ली पोलिसांनी खेडकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्या जामिन अर्जावर न्यायालयानं दिल्ली पोलिस आणि केंद्रीय लोकसवा आयोगाकडून उत्तर मागवलं आहे.