January 14, 2026 1:20 PM
7
देशभरात मकरसंक्रांत, उत्तरायण, लोहडी, माघ बिहू आणि पोंगल सणांचा उत्साह
देशभरात आज मकर संक्रांत, उत्तरायण, लोहडी, माघ बिहू आणि पोंगल हे सण साजरे होते आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सर्व देशवासियांना यानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. हे सण देशाच्या समृद्ध कृषी परंपरांचे प्रतीक आहेत आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना प्रतिबिंबित करतात, असं त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनीही या सणांच्या निमित्ताने सर्वांना आनंद, आरोग्य आणि समृद्धीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. संक्रातींचा सण सर्वांच्या जीवनात आनंद, आरोग्य घेऊन येवो, अशी क...