January 22, 2025 2:16 PM January 22, 2025 2:16 PM

views 8

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षांकडून प्रचाराला सुरुवात

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी तसंच आम आदमी पार्टीचे समन्वयक अरविंद केजरीवाल यांच्या प्रचारसभा होणार आहेत. मोदी आज दूरदृष्यप्रणालीमार्फत बूथ पातळीवरच्या भाजपा कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. भाजपाचे खासदार आमदारही या संवादात सहभागी होतील.