November 29, 2024 8:29 PM November 29, 2024 8:29 PM
12
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपचा विजय हा सरकारच्या धोरणांवर आणि योजनांवर जनतेच्या विश्वासाचं निदर्शक असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
ओदिशा पाठोपाठ, हरियाणा, आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाचा दणदणीत विजय हा लोकांचा सरकारच्या धोरणांवर आणि योजनांवरचा विश्वास दर्शवतो असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री तीन दिवसांच्या ओदिशा दौऱ्यावर असून आज भुवनेश्वरमध्ये बिजू पटनायक आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ त्यांची एक सभा झाली. केंद्रातलं भाजपा सरकार ओदिशाला प्राधान्य देत असून ओदिशामध्ये भाजपाचे सरकार स्थापन झाल्यावर लगेच महिलांसाठी सुभद्रा योजनेसारखी अनेक मोठी पावलं उचलण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. विरोधक...