December 20, 2025 3:22 PM December 20, 2025 3:22 PM

views 8

गडचिरोलीत अतिदुर्गम भागात नव्या पोलीस ठाण्याचं उद्घाटन

गडचिरोलीमधल्या एटापल्ली तालुक्यातल्या अतिदुर्गम तुमरकोठी इथल्या  नव्या पोलीस ठाण्याचं उद्घाटन अपर पोलिस महासंचालक छेरिंग दोरजे यांच्या हस्ते झालं. गडचिरोली पोलीस दलाच्या सी-६० पथकाचे १ हजार कमांडो, बॉम्ब शोधक  आणि  नाशक पथकाचे २१ चमू, नवनियुक्त पोलिस, ५०० पोलिस अधिकारी आणि खासगी कंत्राटदारांच्या मदतीनं हे नवं पोलिस ठाणं उभं राहिलं आहे. हे पोलिस ठाणे कोठी पोलिस ठाण्यापासून ७ किलोमीटर, तर छत्तीसगड सीमेपासून अवघ्या २ किलोमीटर अंतरावर आहे.

July 16, 2024 8:01 PM July 16, 2024 8:01 PM

views 10

साक्षीदारांच्या चौकशीसाठी पोलीसांच्या अखत्यारीतली जागा न निवडण्याचे केंद्रिय गृह मंत्रालयाचे सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना निर्देश

गुन्ह्याचा तपास करताना साक्षीदारांची चौकशी करण्यासाठी पोलीस ठाण्यातली किंवा पोलीस विभागाच्या अखत्यारीतली जागा निवडू नये असं केंद्र सरकारने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सांगितलं आहे.केंद्रीय गृहमंत्रालयाचे सचिव अजय भल्ला यांनी या संदर्भात सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहलं आहे.भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कायद्या अंतर्गत सर्व पोलीस ठाण्यांनी साक्षीदाराची चौकशी ऑडिओ, व्हिडीओ इलेक्ट्रॉनिक साधनांच्या माध्यमातून करण्यासाठी विशिष्ट जागा ठरवून घ्यावी असं सरकारनं...