August 12, 2025 8:08 PM August 12, 2025 8:08 PM
15
राज्यात १५ हजार पोलीस भरती करायला मंजुरी
राज्याच्या पोलीस दलात सुमारे १५ हजार शिपाई भरती करायला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्यातल्या रास्त भाव दुकानदारांच्या नफ्यात वाढ करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं घेतला. आता या दुकानदारांना प्रतिक्विंटल दीडशे ऐवजी १७० रुपये फायदा मिळेल. सोलापूर - पुणे मुंबई हवाई मार्गासाठी व्यापारी तूट भरुन काढण्यासाठी निधी देण्याचा निर्णयही आज झाला. याशिवाय, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत येणाऱ्या महामंडळांतर्फे राबवण्यात येणाऱ्य...