July 17, 2024 2:57 PM

views 23

ओमान येथे मशिदीवर झालेल्या हल्ल्यात एका पोलीस अधिकाऱ्यासह ९ लोकांचा मृत्यू

ओमानमधल्या मस्कत इथल्या अली बिन अबी तालीब या मशिदीवर काल झालेल्या कट्टरपंथीयांच्या हल्ल्यात एका पोलीस अधिकाऱ्यासह ९ लोकांचा मृत्यू झाला आहे, तर २८ जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यात एक भारतीय जखमी झाल्याची माहिती ओमानमधल्या भारतीय दूतावासाने समाजमाध्यमाद्वारे दिली आहे.   ओमानच्या सुरक्षा दलाने केलेल्या प्रतिहल्ल्यात तीन हल्लेखोर मारले गेले आहेत. प्रेषित मोहम्मद यांचे नातु शहीद हुसैन यांच्या स्मृतिप्रित्यर्थ पाळल्या जाणाऱ्या आशुरा या दिवसाच्या पूर्वसंध्येला लोक जमलेले असताना हा हल्ला झाला. ओमानम...