October 21, 2024 1:41 PM October 21, 2024 1:41 PM

views 42

पोलीस स्मृतीदिनानिमित्त देशाचं शहीद पोलिसांना अभिवादन

आज पोलीस स्मृतिदिन. २१ ऑक्टोबर १९५९ रोजी लडाख इथे चिनी सैन्याचा हल्ला परतवताना दहा पोलीस कॉन्स्टेबल शहीद झाले होते. त्यांच्यासह देशभरातल्या विविध मोहिमांमध्ये आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या पोलिसांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी आजचा दिवस पाळला जातो. या निमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज नवी दिल्ली इथल्या राष्ट्रीय पोलीस स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं.   महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या वर्षभरात संपूर्ण देशभरात श...