March 28, 2025 6:53 PM March 28, 2025 6:53 PM

views 12

प्रशांत कोरटकरला २ दिवसांची पोलीस कोठडी

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा प्रशांत कोरटकर याला आज कोल्हापूरच्या न्यायालयानं दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. २५ मार्चला त्याला अटक झाल्यानंतर न्यायालयानं त्याची रवानगी ३ दिवसांच्या पोलीस कोठडीत केली होती.    दरम्यान, आज सुनावणी संपल्यानंतर पोलीस कोरटकरला घेऊन जात असताना एका वकिलानं त्याच्यावर पादत्राणानं हल्ला करायचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्याला पकडलं.

July 18, 2024 7:21 PM July 18, 2024 7:21 PM

views 10

मनोरमा खेडकर यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर यांना न्यायालयानं तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. एका शेतकऱ्याला बंदूक रोखून धमकावल्या प्रकरणी मनोरमा खेडकर यांना रायगड जिल्ह्यात पौड इथल्या पोलिसांनी काल अटक केली होती. त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आलं. एका शेतकऱ्याला बंदूक रोखून धमकावल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणी संबंधित शेतकऱ्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

June 24, 2024 7:49 PM June 24, 2024 7:49 PM

views 12

नीट परीक्षा घोटाळ्यात लातूरमध्ये अटकेत आरोपीला २ जुलैपर्यंत पोलीस कोठडी

    नीट परीक्षा घोटाळ्यात लातूरमध्ये अटकेत असलेल्या एका आरोपीला न्यायालयानं २ जुलैपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. याप्रकरणी ४ जणांविरोधात दहशतवाद विरोधी पथकानं चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. यातल्या एकाला पोलिसांनी काल अटक केली होती. इतर दोघांची चौकशी सुरू आहे आणि दिल्लीतल्या चौथ्या आरोपीच्या अटकेसाठी पोलिस पथक जाणार आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली.