October 21, 2025 3:25 PM October 21, 2025 3:25 PM
74
पोलिस स्मृतिदिनानिमित्त शहीद पोलिसांना अभिवादन
आज पोलीस स्मृतिदिन आहे. १९५९ मध्ये याच दिवशी लडाखमधे हॉट स्प्रिंग्ज इथं सशस्त्र चिनी सैनिकांनी केलेल्या हल्ल्यात दहा शूर पोलिसांना वीरमरण आलं. तेव्हापासून दरवर्षी २१ ऑक्टोबर हा दिवस पोलीस स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी आज पोलीस स्मृतिदिनानिमित्त पोलीस कर्मचाऱ्यांच्या सर्वोच्च बलिदानाला अभिवादन केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पोलिस कर्मचाऱ्यांनी कर्तव्य बजावताना दिलेल्या सर्वोच्च बलिदानाचं स्मरण करून त्यांना आज श्रद्धांजली वाहिली. संरक्षण म...