November 30, 2025 7:45 PM November 30, 2025 7:45 PM
8
संवेदनशीलता, प्रतिसाद देण्याची क्षमता आणि व्यावसायिकता वाढवून लोकांची पोलिसांबद्दलची धारणा बदलण्याची गरज – प्रधानमंत्री
संवेदनशीलता, प्रतिसाद देण्याची क्षमता आणि व्यावसायिकता वाढवून लोकांची पोलिसांबद्दलची धारणा बदलण्याची गरज असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. रायपूर इथं पोलीस महासंचालकांच्या ६० व्या अखिल भारतीय परिषदेत अध्यक्षस्थानावरून बोलत होते. नव्या फौजदारी कायद्यांबाबत जनजागृती करण्याची गरजही त्यांनी यावेळी व्यक्त केली. निर्जन बेटांना एकत्र जोडण्यासाठी नाविन्यपूर्ण धोरणं राबवा, NATGRID अंतर्गत एकत्रित केलेल्या डेटाबेसचा वापर करा, आणि कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करून या प्रणाली एकमेका...