December 30, 2025 7:26 PM December 30, 2025 7:26 PM
1
पीएम युवा योजनेच्या तिसऱ्या टप्प्यातल्या विजेत्यांची घोषणा
युवा लेखकांना मार्गदर्शन करण्यासाठी पीएम युवा योजनेच्या तिसऱ्या टप्प्यातल्या विजेत्यांची घोषणा आज झाली. इंग्रजीसह एकूण २२ भारतीय भाषांमधल्या ४३ विजेत्यांचा यात समावेश आहे. मराठीसाठी दिव्यांशू सिंग, अंबादास मेव्हाणकर आणि प्रसाद जाधव या लेखकांचा यात समावेश आहे. सर्व विजेत्यांच्या संकल्पनांचं पुस्तकात रुपांतर करण्यासाठी या लेखकांना सहा महिन्यांचं मार्गदर्शन आणि दर महिन्याला ५० हजारांची शिष्यवृत्ती मिळणार आहे. याशिवाय पुस्तक प्रसिद्ध झाल्यावर आयुष्यभरासाठी १० टक्के रॉयल्टी दिली जाणार आहे.