January 10, 2026 8:10 PM January 10, 2026 8:10 PM

views 3

‘सोमनाथ स्वाभिमान पर्व’ मध्ये प्रधानमंत्री सहभागी होणार

तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर असलेले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सोमनाथला पोहोचले आहेत.  गुजरातमधल्या  प्रभास पाटण इथं  आयोजित 'सोमनाथ स्वाभिमान पर्व' मध्ये प्रधानमंत्री  मोदी सहभागी होणार आहेत. वर्ष १०२६ मध्ये सोमनाथ मंदिरावर झालेल्या आक्रमणाला १००० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त तसंच  १९५१ मध्ये  स्वातंत्र्यानंतर मंदिराच्या पुनर्बांधणीला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.  प्रधानमंत्री मोदी मंदिराच्या परिसरात होणाऱ्या  'ओंकार जपा' मध्येही  सहभागी होतील. प्रधानमंत्री मो...