October 26, 2025 8:35 PM October 26, 2025 8:35 PM
32
जीएसटी बचत महोत्सवामुळे नागरिकांमध्ये खूप उत्साह असल्याचं प्रधानमंत्र्यांचं ‘मन की बात’ मध्ये प्रतिपादन
देशभरात सध्या जीएसटी बचत महोत्सव सुरू असून यामुळे नागरिकांमध्ये खूप उत्साह आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीवरच्या 'मन की बात' या कार्यक्रमातून त्यांनी आज देशवासीयांशी संवाद साधला. हा या कार्यक्रमाचा १२७वा भाग होता. यंदाच्या सणासुदीच्या काळात स्वदेशी वस्तूंची खरेदी प्रचंड वाढली असल्याचं त्यांनी सांगितलं. कोणकोणती स्वदेशी उत्पादनं आपण खरेदी केली, याबद्दल नागरिकांनी संदेश पाठवून कळवल्याचंही प्रधानमंत्र्यांनी सांगितलं. ऑपरेशन सिंदूरनं प्रत्येक भारतीयाला अभिमानानं भारून ट...