September 12, 2024 3:35 PM September 12, 2024 3:35 PM

views 24

प्रधानमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत ७० हजार कोटींहून अधिक खर्चाचे रस्ते बांधायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

केंद्रीय मंत्रिमंडळानं २०२४-२५ ते २०२८-२९ या आर्थिक वर्षांसाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेची अंमलबजावणी करण्याचा ग्रामविकास खात्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. या योजनेचा एकंदर खर्च ७० हजार १२४ कोटी रुपये इतका असणार आहे. केंद्रीय मंत्री आश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत मंत्रिमंडळ बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. दळणवळणाच्या कक्षेत नसलेल्या सुमारे २५ हजार पात्र गावांना जोडण्यासाठी ६२ हजार ५०० किलोमीटरचे रस्ते बांधण्यासाठी आर्थिक साह्य दिलं जाणार आहे. या योजनेमुळे चाळीस हजार मानवी दि...