July 5, 2024 2:52 PM July 5, 2024 2:52 PM

views 12

पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारताचं २८ खेळाडूंचं पथक जाहीर

पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारताचं २८ खेळाडूंचं पथक जाहीर झालं आहे. त्यात नीरज चोप्रा, अविनाश साबळे, कुशोर कुमार जेना, सर्वेश कुशारे, अक्षदीप सिंह या पुरुष खेळाडूंचा समावेश आहे. तर किरण पहल, पारुल चौधरी, ज्योती याराजी, प्रियांका गोस्वामी या महिला खेळाडूही या पथकात असतील. धावणे, भालाफेक, गोळाफेक, अडथळा शर्यत, तिहेरी उडी, उंच उडी, रिले आणि मिश्र मॅरेथॉन अशा विविध खेळांमध्ये ऑलिम्पिक पात्रता फेरी गाठली होती.   प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल या पथकातल्या खेळाडूंशी संवाद साधला. ऑलिम्पिक स्पर्धेतून फक्त ...

July 5, 2024 10:54 AM July 5, 2024 10:54 AM

views 43

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी २ दिवसांच्या रशिया दौऱ्यावर जाणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 8 आणि 9 जुलै ला रशिया दौऱ्यावर जात आहेत. रशियाचे राष्ट्रपती ब्लादीमीर पुतीन यांच्या निमंत्रणावरुंन पंतप्रधान मोदी या दौऱ्यावर जात असून ते मास्को इथ 22 व्या भारत रशिया वार्षिक शिखर बैठकीला उपस्थित राहणार आहेत. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये विविध प्रांतिक आणि वैश्विक मुददयांवर चर्चा होणार असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.   त्यानंतर 9 आणि 10 जुलै रोजी पंतप्रधान मोदी ऑस्ट्रिया देशाच्या दौऱ्यावर जाणार असून, गेल्या 41 वर्षात भारताचे पंतप्रधान प्रथमच या दे...

June 28, 2024 9:54 AM June 28, 2024 9:54 AM

views 5

मन की बात कार्यक्रमाचा १११ वा भाग येत्या रविवारी

  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या रविवारी आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमाद्वारे सकाळी ११ वाजता देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेतील तिसऱ्या आवृत्तीचा हा पहिला भाग असून या कार्यक्रमाचा हा १११ वा भाग असेल.   आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या, तसेच यूट्यूब चॅनेलवरून तसंच न्यूज ऑन एआयआर अॅपवर याचं थेट प्रसारण श्रोत्यांना ऐकता येणार आहे. त्यानंतर लगेचच प्रादेशिक भाषेतला अनुवादही प्रसारित होणार आहे.

June 28, 2024 8:55 AM June 28, 2024 8:55 AM

views 3

१८वी लोकसभा अनेक बाबतीत ऐतिहासिक असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन

देशातल्या जनतेनं या सरकारला तिसऱ्यांदा निवडून देऊन, गेल्या दहा वर्षातल्या सेवा आणि सुशासनावर पसंतीची मोहोर उमटवली आहे, असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल केलं. अठराव्या लोकसभेच्या स्थापनेनंतर संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला त्यांनी संबोधित केलं. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील रालोआ सरकार आपल्या आकांक्षा पूर्ण करेल, असा जनतेला विश्वास वाटतो, असं संगत; अठरावी लोकसभा अनेक बाबतीत ऐतिहासिक असल्याचं त्या म्हणाल्या.   पेपर फुटीप्रकरणी सरकार ठोस उपाययोजना करत आहे, य...

June 25, 2024 1:47 PM June 25, 2024 1:47 PM

views 22

राजकीय आणीबाणीचा विरोध करणाऱ्या सर्वांना प्रधानमंत्र्यांकडून आदरांजली

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी १९७५ मध्ये देशात लागू करण्यात आलेल्या राजकीय आणीबाणीचा विरोध करणाऱ्या सर्व स्त्री - पुरुषांना आदरांजली वाहिली आहे. सर्व भारतीयांना सन्मानिय असणाऱ्या संविधानाला अपमानित करत काँग्रेसनं जनतेच्या मुलभूत स्वातंत्र्याचं हनन केलं होतं, याची आठवण करून देणारा हा दिवस असल्याचं, प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावरच्या एका पोस्टमध्ये म्हटलं आहे.

June 24, 2024 1:36 PM June 24, 2024 1:36 PM

views 10

संविधानाचं पावित्र्य राखून लवकर निर्णय घ्यायचे असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

विकसित भारत घडवण्याच्या संकल्पाने १८ व्या लोकसभेचे पहिलं अधिवेशन सुरू होत असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आपलं सरकार देशसेवेसाठी आणि जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठा सातत्यानं प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी म्हटलं. अधिवेशनापूर्वी संसदेच्या आवारात त्यांनी पत्रकारांना संबोधित केलं. आपल्या सरकारला सर्वांना सोबत घेऊनआणि संविधानाचे पावित्र्य राखून लवकर निर्णय घ्यायचे असल्याचं त्यांनी सांगितलं. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाचं लोकसभेच्या खासदारांचा शपथविधी सोहळा नवीन संसद भ...