February 14, 2025 1:25 PM February 14, 2025 1:25 PM

views 45

पुढल्या संकटाचा सामना करण्यासाठी गौतम बुद्धांची शिकवण हाच उपाय- प्रधानमंत्री

संपूर्ण जग आज पर्यावरणापुढल्या संकटाचा सामना करत असून भगवान गौतम बुद्धांची शिकवण हाच यावरचा उपाय आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. थायलंड इथं आयोजित संवाद कार्यक्रमाला त्यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित केलं.   भगवान बुद्ध यांचा संयमाचा विचार जागतिक आव्हानाला सामोरं जाताना आपल्यासाठी मार्गदर्शक ठरतो, असं ते यावेळी म्हणाले. पर्यावरण विषयक संकटामुळे पृथ्वीला धोका उत्पन्न झाला आहे, आपण निसर्गापासून वेगळे नाहीत, असं हिंदू आणि बौद्ध धर्माचा विचार आपल्याला शिकवतो असं ते ...

January 12, 2025 8:09 PM January 12, 2025 8:09 PM

views 11

तरुणांच्या क्षमतेमुळे भारत लवकरच विकसित होईल-प्रधानमंत्री

तरुणांच्या क्षमतेमुळे भारत लवकरच विकसित होईल, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीदिनी साजऱ्या केल्या जाणाऱ्या राष्ट्रीय युवा दिनानिमित्त नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं आयोजित कार्यक्रमात युवा नेत्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. भारतातले तरुण उल्लेखनीय` परिवर्तन घडवून आणत आहेत, आपला तरुण पिढीवर विश्वास असून तरुणांकडे प्रत्येक अडचणीचं उत्तर आहे, असे गौरवोद्गार प्रधानमंत्र्यांनी काढले.  महत्त्वाकांक्षी  उद्दिष्टं साध्य करण्यासाठी देशातल्या प्रत्येक न...

December 14, 2024 6:07 PM December 14, 2024 6:07 PM

views 11

प्रधानमंत्र्यांनी दिग्गज अभिनेता राज कपूर यांच्या शतकमहोत्सवी जयंतीनिमित्त श्रद्धांजली वाहिली

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिग्गज अभिनेता राज कपूर यांच्या शतकमहोत्सवी जयंतीनिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहिली. राज कपूर हे केवळ चित्रपट निर्मातेच नव्हते तर सांस्कृतिक दूत होते. त्यांनी भारतीय सिनेमाला जागतिक मंचावर ओळख दिली, अशा शब्दांत प्रधानमंत्री मोदी यांनी समाज माध्यमांवरील एका पोस्टद्वारे राज कपूर यांची प्रशंसा केली. राज कपूर यांचे सिनेमे कला, भावना आणि सामाजिक भाष्यासह सामान्यांच्या आकांक्षा आणि संघर्षाचे चित्रण करत, असे सांगत प्रधानमंत्र्यांनी राज कपूर यांच्या सिनेमांतील अजरामर भूमि...

December 1, 2024 7:18 PM December 1, 2024 7:18 PM

views 24

भुवनेश्वर इथं पोलीस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षक परिषदेचा प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत समारोप

भुवनेश्वर इथे आयोजित अखिल भारतीय महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षक परिषदेचा आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत समारोप झाला. तीन दिवस चाललेल्या या परिषदेच्या आजच्या शेवटच्या दिवशी प्रधानमंत्र्यांनी देशातल्या विविध राज्यं तसंच केंद्रशासित प्रदेशांच्या सुरक्षेशी संबंधित महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली. सायबर गुन्हे, किनारीपट्टी लगतची सुरक्षा, माओवादी बंडखोरी हे चर्चेचे विषय होते. भारताच्या विकासात अडथळा आणणाऱ्या बाबी, सीमेपलीकडून होणारा दहशतवाद आणि तस्करी, देशांतर्गत नक्षलवादाचं आव्हा...

November 29, 2024 8:29 PM November 29, 2024 8:29 PM

views 14

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपचा विजय हा सरकारच्या धोरणांवर आणि योजनांवर जनतेच्या विश्वासाचं निदर्शक असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

ओदिशा पाठोपाठ, हरियाणा, आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाचा दणदणीत विजय हा लोकांचा सरकारच्या धोरणांवर आणि योजनांवरचा विश्वास दर्शवतो असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री तीन दिवसांच्या ओदिशा दौऱ्यावर असून आज भुवनेश्वरमध्ये बिजू पटनायक आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ त्यांची एक सभा झाली. केंद्रातलं भाजपा सरकार ओदिशाला प्राधान्य देत असून ओदिशामध्ये भाजपाचे सरकार स्थापन झाल्यावर लगेच महिलांसाठी सुभद्रा योजनेसारखी अनेक मोठी पावलं उचलण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. विरोधक...

September 7, 2024 3:17 PM September 7, 2024 3:17 PM

views 10

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून भाविकांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा

१४ विद्या आणि ६४ कलांचा अधिपती असणाऱ्या विघ्नहर्त्या गणपती बाप्पाचं आगमन भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या आजच्या दिवशी घरोघरी आणि सार्वजनिक मंडपांमध्ये मोठ्या उत्साहात झालं. महाराष्ट्राचं वैशिष्ट्य असलेला हा अनोखा उत्सव अनुभवण्यासाठी अनेक परदेशी पर्यटकांचं आगमनही मुंबई - पुण्यात झालं आहे. दहा दिवस चालणाऱ्या या उत्सव काळात राज्यात सुमारे ११ हजार कोटी रुपयांहून अधिक व्यापार होण्याची शक्यता व्यापारी संघटनांनी व्यक्त केली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आण...

September 1, 2024 1:24 PM September 1, 2024 1:24 PM

views 5

उद्योगधंद्यांना सुविधा देण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन

भारत हा जागतिक दृष्ट्या असंख्य संधी असणारा देश असून उद्योगधंद्याना आवश्यक सुविधा, स्थिर धोरणात्मक सुधारणा आणि उच्च वृद्धी दर प्रदान करण्यासाठी केंद्रसरकार वचनबद्ध आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्लीत इकनॉमिक टाइम्स वर्ल्ड लीडर्स फोरम मध्ये बोलत होते. आगामी काळात गुंतवणूकदारांनी नवोन्मेष, उत्तम कामगिरी, सकारात्मक पर्यायांना पसंती आणि दर्जेदार उत्पादनांचा संकल्प करावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. यावर्षी जगातल्या अनेक राष्ट्रांमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये बऱ्य...

August 9, 2024 2:24 PM August 9, 2024 2:24 PM

views 9

बांगलादेश हंगामी सरकारचे प्रमुख म्हणून डॉ. मोहम्मद युनूस यांनी घेतली शपथ

बांगलादेशात हंगामी सरकारचे प्रमुख म्हणून काल नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ञ मोहम्मद युनूस यांनी शपथ घेतली. बांगलादेशाचे राष्ट्रपति महंमद शाहबुद्दीन यांनी त्यांना ढाका इथ वंग भवन इथ पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी विविध देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते.   मोहम्मद युनूस यांचा जन्म 28 जून 1940 रोजी झाला. ते बांगलादेशातील नामवंत उद्योगपती, बँकर आणि अर्थतज्ञ आहेत. ग्रामीण बँकेची स्थापना करून सूक्ष्म पातळीवर कर्ज आणि अर्थपुरवठा याबाबत त्यांनी केलेल्या कार्याबद्दल 2006 मध्ये त्यांचा नोबेल पुरस्क...

August 4, 2024 2:53 PM August 4, 2024 2:53 PM

views 11

कृषी अर्थतज्ज्ञांच्या ३२व्या आंतरराष्ट्रीय परिषदेत परदेशी प्रतिनिधींकडून भारतातल्या कृषी क्षमतेची आणि कृषीक्षेत्रातल्या एकंदर यशोगाथेची प्रशंसा

नवी दिल्ली इथं आयोजित कृषी अर्थतज्ज्ञांच्या ३२व्या आंतरराष्ट्रीय परिषदेत उपस्थित असलेल्या परदेशी प्रतिनिधींनी भारतातल्या कृषी क्षमतेची आणि कृषीक्षेत्रातल्या एकंदर यशोगाथेची प्रशंसा केली आहे. या सहा दिवसीय परिषदेला ७५ देशांमधले कृषी अर्थतज्ञ उपस्थित असून त्यांनी  भारताच्या कृषिक्षेत्रातल्या कामगिरीचं आणि संशोधनाचं कौतुक केले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल या परिषदेचं उद्घाटन झालं. भारत अनेक कृषी उत्पादनांमधला अग्रणी उत्पादक आहे, भारताची वैविध्यपूर्ण जैवसंस्था आणि कृषी शिक्षणासाठ...

July 27, 2024 8:23 PM July 27, 2024 8:23 PM

views 41

विकसित भारत हे प्रत्येक सर्व देशवासियांचं ध्येय असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

विकसित  भारत २०४७ हे प्रत्येक भारतीयाचं ध्येय असून ते साध्य करण्यासाठी राज्य सरकारं महत्वाची भूमिका पार पाडू शकतात, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. नवी दिल्लीत नीती आयोगाच्या ९ व्या बैठकीत ते आज बोलत होते. हे दशक तांत्रिक, भौगोलिक, राजकीय बदलाचं तसचं नवी संधी उपलब्ध करणारं असल्याचंही त्यांनी सांगितलं. भारतानं या संधीचा वापर करुन आंतरराष्ट्रीय स्तरावरील गुंतवणूक वाढवायला हवी असंही ते म्हणाले.  या वर्षीच्या बैठकीचं घोषवाक्य ‘विकसित भारत २०४७’ असून त्याच्या ध्येय धोरणांच्या म...