September 8, 2025 2:35 PM September 8, 2025 2:35 PM

views 51

प्रधानमंत्री भाजपा खासदारांच्या प्रशिक्षण कार्यशाळेला संबोधित करणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्ली इथं भाजपा खासदारांच्या प्रशिक्षण कार्यशाळेच्या सांगता समारंभाला संबोधित करणार आहेत. उद्या होणाऱ्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रियेचं मूलभूत प्रशिक्षण खासदारांना देण्यासाठी कालपासून ही कार्यशाळा घेण्यात आली.   प्रधानमंत्री सर्व प्रशिक्षण सत्रांमध्ये उपस्थित होते, अशी माहिती केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली. संयुक्त लोकशाही आघाडीतल्या इतर पक्षांचे खासदारही आज कार्यशाळेत सहभागी होतील. वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी वस्त...

September 8, 2025 9:56 AM September 8, 2025 9:56 AM

views 18

पूरग्रस्त पंजाबची पाहणी करण्यासाठी प्रधानमंत्र्यांचा उद्या दौरा

पंजाबमधील पुरस्थितीचा आढावा घेण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या पंजाबच्या दौऱ्यावर जाणार आहेत. स्थानिक पुरपरिस्थितीचे मूल्यांकन आणि बाधित नागरिकांना त्वरित मदत मिळण्याच्या उद्देशानं ते पाहणी करतील अशी माहिती पंजाब भाजपाचे अध्यक्ष सुनील जाखड यांनी समाजमाध्यवरील संदेशात दिली आहे. प्रधानमंत्री या परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून असल्याचं त्यांनी सांगितलं.  केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी या भागाला नुकतीच भेट दिली. तसंच  या भागाची पाहणी करण्यासाठी दोन ...

August 29, 2025 11:21 AM August 29, 2025 11:21 AM

views 15

प्रधानमंत्री टोकियोमध्ये 15व्या भारत-जपान वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या जपान दौऱ्यासाठी आज सकाळी टोकियो इथं दाखल झाले असून अत्यंत  उत्साही वातावरणात त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं. टोकियोमध्ये होणाऱ्या 15व्या भारत-जपान वार्षिक शिखर परिषदेत ते सहभागी होणार आहेत.   जपानचे प्रधानमंत्री शिगेरू इशिबा यांच्या निमंत्रणावरून ही भेट होत आहे. शिखर परिषदेदरम्यान, दोन्ही नेते द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेणार आहेत. तसंच गेल्या 11 वर्षांत वृद्धिंगत होत असलेली धोरणात्मक आणि जागतिक भागीदारी पुढे नेण्याच्या दृष्टीनं दोन्ही नेत्यांमध्ये ...

August 28, 2025 4:47 PM August 28, 2025 4:47 PM

views 9

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज जपान दौऱ्यावर जाणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज संध्याकाळी जपानला रवाना होणार आहे. १५ व्या भारत जपान वार्षिक शिखर परिषदेत ते सहभागी होणार आहेत. जपानचे प्रधानमंत्री शिगेरू इशिबा यांच्यासोबतची ही त्यांची शिखर परिषद आहे. संरक्षण आणि सुरक्षा, व्यापार, तंत्रज्ञान, आणि नवोन्मेष यावर या बैठकीत चर्चा होईल, असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे.    दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात, प्रधानमंत्री मोदी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या आमंत्रणावरून ३१ ऑगस्ट ते १ सप्टेंबर दरम्यान तियानजिन इथं होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या श...

August 3, 2025 10:20 AM August 3, 2025 10:20 AM

views 15

व्होकल फॉर लोकल या संकल्पनेअंतर्गत स्थानिक उत्पादनांना प्राधान्य देण्याचं प्रधानमंत्री यांच आवाहन

व्होकल फॉर लोकल या संकल्पनेअंतर्गत स्थानिक उत्पादनांना प्राधान्य देण्याचं आवाहन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. काल वाराणसी इथं, प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा २० वा हप्ता प्रधानमंत्र्यांच्या हस्ते जारी करण्यात आला, त्यावेळी उपस्थितांना संबोधित करतांना ते बोलत होते, २०१९ मध्ये पीएम किसान योजना सुरु केल्यानंतर विरोधी पक्षांनी या योजनेबद्दल शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, मात्र, सरकारनं या योजनेअंतर्गत आतापर्यंत एकूण पावणे चार लाख कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर निधी जमा...

July 26, 2025 1:32 PM July 26, 2025 1:32 PM

views 47

तमिळनाडूमधे प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन

 मालदीव दौऱ्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज संध्याकाळी दोन दिवसांच्या तमिळनाडू दौऱ्यासाठी तुतिकोरीन इथं पोहोचतील. तुतिकोरीन विमानतळाच्या नव्या टर्मिनल इमारतीचं उद्घाटन ते करतील. तसंच ४ हजार ६०० कोटी रुपयांच्या विविध विकासकामांची पायाभरणी आणि लोकार्पण प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.   अरियालूर जिल्ह्यातल्या गंगईकोंडा चोलापुरम मंदिरात चोल सम्राट राजेंद्र चोल पहिले यांच्या स्मरणार्थ आयोजित आदि थिरुवादिरई उत्सवातही प्रधानमंत्री सहभागी होतील. राजेंद्र चोल यांनी आग्नेय आशियावर समुद्रमार्...

July 26, 2025 11:11 AM July 26, 2025 11:11 AM

views 31

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे सलग सर्वाधिक काळासाठी राहिलेले ठरले दुसरे प्रधानमंत्री

नरेंद्र मोदी हे सलग सर्वाधिक काळासाठी प्रधानमंत्रीपदी राहिलेले दुसरे प्रधानमंत्री ठरले आहेत. त्यांनी प्रधानमंत्रीपदाचे 4 हजार 78 दिवस काल पूर्ण केले. माजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांचा या संदर्भातला विक्रम त्यांनी मोडला आहे.   भाजपा प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी काल माध्यमांना ही माहिती दिली. प्रधानमंत्री मोदी यांचा कार्यकाळ विकासाचे सुवर्णयुग ठरला, असं मत त्यांनी नोंदवलं. माजी प्रधानमंत्री पंडीत नेहरु यांनी सर्वाधिक म्हणजे सलग 17 वर्ष प्रधानमंत्री म्हणून काम केलं आहे.

July 11, 2025 3:40 PM July 11, 2025 3:40 PM

views 38

सरकारी विभागांतल्या नव्यानं नियुक्त झालेल्या युवकांना प्रधानमंत्री नियुक्ती पत्रांचं वितरण करणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या दूरदृश्यप्रणाली द्वारे विविध सरकारी विभागांतल्या नव्यानं नियुक्त झालेल्या युवकांना ५१ हजारांहून अधिक नियुक्ती पत्रांचं वितरण करणार आहेत. हा १६वां रोजगार मेळा देशभरात ४७ ठिकाणी आयोजित केला जाणार असून प्रधानमंत्री यात संबोधन करणार आहेत.   नवीन भरती केलेले युवक रेल्वे मंत्रालय, गृह मंत्रालय, आरोग्य-कुटुंब कल्याण, कामगार-रोजगार, पोस्ट यासह अन्य विभागांमध्ये सामील होतील. देशभरात रोजगार मेळ्यांद्वारे आजवर १० लाखांहून अधिक नियुक्ती पत्रं जारी करण्यात आली आहेत.

July 3, 2025 1:25 PM July 3, 2025 1:25 PM

views 45

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी घाना इथल्या संसदेत भाषण करणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी घाना, त्रिनिदाद टोबॅगो, अर्जेंटिना, ब्राझील आणि नामिबियाच्या दौऱ्यावर आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज दुपारी घाना इथल्या संसदेत भाषण करणार असून अक्रा इथल्या भारतीय समुदायाशी संवाद साधतील.   अक्रा इथल्या एनक्रुमा स्मारकालाही ते भेट देणार आहेत. तत्पूर्वी आज त्यांनी घानाचे अध्यक्ष जॉन ड्रामानी महामा यांच्याशी चर्चा केली. या चर्चेत दोन्ही नेत्यांनी व्यापार, गुंतवणूक, शेती, डिजिटल तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा अशा विविध क्षेत्रात द्विपक्षीय भागीदारी वाढवण्याविषयी सहमती ...

June 6, 2025 8:25 PM June 6, 2025 8:25 PM

views 18

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी महिना अखेरीला कॅनडामध्ये होणाऱ्या जी-सेव्हन शिखर परिषदेला उपस्थित राहणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या महिन्याच्या अखेरीस कॅनडामध्ये होणाऱ्या जी- सेव्हन शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत. जी- सेव्हन शिखर परिषदेसाठी कॅनडाचे प्रधानमंत्री मार्क कार्नी यांनी आमंत्रित केल्याबद्दल प्रधानमंत्री मोदी यांनी त्यांचे आभार मानले आहेत. तसंच कार्नी यांना निवडणुकीत मिळालेल्या विजयाबद्दल त्यांनी समाजमाध्यमावर केलेल्या पोस्टमध्ये त्यांचं अभिनंदन केलं आहे. भारत आणि कॅनडामध्ये परस्पर आदर आणि हितसंबंधं असून दोन्ही देश नव्या जोमाने एकत्र काम करतील असं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे.