November 7, 2024 11:06 AM November 7, 2024 11:06 AM

views 9

प्रधानमंत्री विद्यालक्ष्मी योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी केंद्र सरकारनं पीएम-विद्यालक्ष्मी योजनेला मान्यता दिली आहे. या निर्णयाची माहिती देताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, उच्च शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना तारणमुक्त आणि विना-हमीदार कर्ज मिळण्यास ते पात्र असतील. आर्थिक अडचणींमुळं भारतातील कोणताही तरुण दर्जेदार उच्च शिक्षण घेण्यापासून वंचित राहू नये यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. सरकारनं भारतीय अन्न महामंडळासाठी 10 हजार 700 कोटी रुपयांचं नवीन भांडवल देण्याचाही निर्णय घेतला आहे. &n...

November 6, 2024 8:10 PM November 6, 2024 8:10 PM

views 13

पीएम विद्यालक्ष्मी योजनेमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील आर्थिक अडथळे दूर होतील – शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान

३ हजार सहाशे कोटी रुपयांच्या पीएम विद्यालक्ष्मी योजनेला कॅबिनेटनं मंजुरी दिल्यानं विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील आर्थिक अडथळे दूर होण्यास मदत होईल, असं केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं आहे. विनातारण आणि विनाहमी शैक्षणिक कर्जामुळे गुणवंत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचा जास्तीत जास्त लाभ घेता येईल, असं त्यांनी समाज माध्यमावर संदेशात म्हटलं आहे. ८ लाख रुपयांपर्यंत वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांना १० लाख रुपयांपर्यंतच्या शैक्षणिक कर्जावर ३ टक्के व्याजसवलत मिळणार आहे ...