August 27, 2025 8:14 PM
6
पीएम स्वनिधी योजनेच्या मुदतवाढीला आणि अतिरीक्त कर्ज द्यायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
पीएम स्वनिधी अर्थात प्रधानमंत्री पथविक्रेते आत्मनिर्भर निधी योजनेच्या पुनर्रचनेला केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. त्यानुसार पहिल्यांदा कर्ज घेणाऱ्यांना १० ऐवजी १५ हजार आणि दुसऱ्यांदा कर्ज घेणाऱ्यांना २० हजार ऐवजी २५ हजार रुपये कर्ज मिळेल. तिसऱ्यांदा कर्ज घेणाऱ्यांना मात्र ५० हजार रुपयेच कर्ज दिलं जाईल. या पुनर्रचनेमुळे ५० लाख नव्या लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळेल. आणखी अनेक शहरं आणि गावांमध्ये ही योजना राबवली जाणार आहे. या योजनेअंतर्गत कर्ज वितरणाची मुदत आता ३१ मार्च २०३० पर्यंत वाढवली आ...