August 12, 2024 7:58 PM August 12, 2024 7:58 PM
9
प्रधानमंत्री- सूर्य घर- मोफत वीज योजनेंतर्गत आदर्श सौर गावांच्या निवड प्रक्रियेसाठी केंद्र सरकारचे निर्देश जारी
प्रधानमंत्री-सूर्य घर-मोफत वीज योजनेंतर्गत आदर्श सौर गावांची निवड करण्याची प्रक्रिया सुरु करण्यासाठी केंद्र सरकारनं निर्देश जारी केले आहेत. या योजनेंतर्गत देशभरातल्या प्रत्येक जिल्ह्यातलं ५ हजाराहून अधिक लोकसंख्येचं एकेक गाव आदर्श सौर ग्राम म्हणून विकसित केलं जाणार आहे. विशेष दर्जा प्राप्त असलेल्या राज्यांमधल्या गावांसाठी लोकसंख्येबाबतची अट काहीशी शिथिल राहणार आहे. निवडलेल्या गावांना सौर ऊर्जा यंत्रणा उभारणीसाठी प्रत्येकी १ कोटी रुपयांचं अनुदान मिळेल. मात्र या योजनेंतर्गत निवड करण्यापूर्वी संबं...