October 24, 2025 8:20 PM October 24, 2025 8:20 PM

views 46

रोजगार मेळाव्यात ५१ हजार युवकांना नियुक्तीपत्रांचं वाटप

देशाच्या युवावर्गाची स्वप्ने रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून पूर्ण होत आहेत, असं प्रधानमंत्र्यांनी नवी दिल्लीतल्या सतराव्या रोजगार मेळाव्याला व्हिडीओ संदेशाच्या माध्यमातून संबोधित करताना म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र वितरणाचा कार्यक्रम आज सतराव्या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून देशभरात होत आहे. या रोजगार मेळाव्यात वेगवेगळ्या सरकारी खात्यांमध्ये पद मिळालेल्या ५१ हजार  उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात आली.  रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून आतापर्यंत ११ लाख नियुक्त्या करण्यात आल्...

October 28, 2024 5:39 PM October 28, 2024 5:39 PM

views 26

प्रधानमंत्री उद्या आभासी पद्धतीनं युवकांना नियुक्तीपत्रं वितरीत करणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आभासी पद्धतीनं ५१ हजाराहून अधिक युवकांना नियुक्तीपत्रं वितरीत करणार आहेत. देशात ४० ठिकाणी हे रोजगार मेळावे आयोजित केले जाणार  आहेत. विविध केंद्रीय मंत्रालयं आणि विभागांमधे नव्यानं भर्ती झालेले कर्मचारीही या मेळाव्यांमधे सहभागी होणार आहेत. १४०० हून अधिक इ लर्निंग अभ्यासक्रम असून त्यामुळे कर्मचाऱ्यांमधे आवश्यक ती कौशल्य सक्षमपणे विकसित होतील.