September 16, 2025 8:55 PM

views 45

प्रधानमंत्र्यांना मिळालेल्या भेटवस्तूंचा लिलाव

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना भेटरूपाने मिळालेल्या १ हजार ३०० हून अधिक वस्तूंचा आजपासून ऑन लाईन पद्धतीनं लिलाव सुरू झाला. केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह यांनी आज नवी दिल्ली इथं याबाबत माहिती दिली. या लिलावातून उपलब्ध होणार निधी नमामी गंगे सारख्या सरकारी योजना राबवण्यासाठी खर्च केला जाणार आहे. यापूर्वी केलेल्या अशा प्रकारच्या लिलावांच्या  माध्यमातून ५० कोटी रुपयांहून अधिक निधी जमा झाला असल्याचंही सिंह यांनी यावेळी स्पष्ट केलं. 

September 16, 2025 8:10 PM

views 42

प्रधानमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यातल्या सर्व नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्ये एक उद्यान विकसित करण्यात येणार असून या उद्यानांना नमो उद्यान असं नाव देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. प्रत्येक उद्यानासाठी १ कोटी रुपयांचा निधीही देण्यात येणार आहे. नव्याने विकसित झालेल्या या उद्यानांची विभागीय स्तरावर स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. त्या माध्यमातून प्रत्येक विभागातून ३ नगरपरिषद आणि नगरपंचायतींना बक्षिसं दिल...

August 24, 2025 10:08 AM

views 27

अंतराळ क्षेत्रात भारतीय तरुणांसाठी मोठी संधी असल्याचा प्रधानमंत्र्यांचा विश्वास

 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शास्त्रज्ञांना मानवतेच्या भविष्याकरिता अवकाशाच्या खोल  शोधासाठी तयारी करण्याचं आवाहन केलं आहे.  काल राष्ट्रीय अवकाश दिनानिमित्त एका चलचित्र संदेशात मोदी म्हणाले की, भारत चंद्र आणि मंगळावर पोहोचला असल्याचं सांगताना मोदी यांनी भारत क्रायोजेनिक इंजिन आणि इलेक्ट्रिक प्रोपल्शनसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानात वेगाने प्रगती करत आहे असं म्हणाले.   आपल्या शास्त्रज्ञांच्या समर्पित प्रयत्नांनी भारत लवकरच गगनयान मोहीम सुरू करेल आणि येत्या काही वर्षांत स्वतःचे अंतराळ स्थानक उभ...

August 22, 2025 8:40 PM

views 27

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते बिहारमध्ये विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन

प्रधानमंत्र्यांपासून ते मुख्यमंत्र्यांसहित कोणत्याही मंत्र्याला अटक झाल्यास जर ३० दिवसांच्या आत त्याला जामीन मिळाला नाही तर  ३१व्या दिवशी त्याला राजीनामा द्यावा लागेल असा कायदा केंद्र सरकार आणू पाहत आहे, परंतु सर्व विरोधी पक्ष याला विरोध करत आहेत, अशी टीका प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केली. बिहारच्या गयाजी इथं आज ते एका जाहीर सभेत बोलत होते.    प्रधानमंत्री आज बिहार आणि पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. बिहारमध्ये गयाजी इथं १३ हजार कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद...

August 22, 2025 9:54 AM

views 26

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी बिहार आणि पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज बिहार आणि पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. बिहारमधल्या गया इथं ते विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करणार आहेत. तसंच गया ते दिल्ली अमृत भारत एक्स्प्रेस गाडीलाही ते हिरवा झेंडा दाखवतील.  ६ हजार ८८० कोटींच्या ६६० मेगावॅट बक्सर औष्णिक विद्युत केंद्राचं उद्घाटनही प्रधानमंत्री करतील. तसंच ते १२६० कोटींच्या शहरी विकास प्रकल्पांची पायाभरणीही करणार आहेत.

August 20, 2025 1:10 PM

views 29

प्रधानमंत्री मोदी बिहारमध्ये औंटा-सिमारिया प्रकल्पाचं उद्घाटन करणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या २२ तारखेला बिहारमध्ये गया इथं औंटा-सिमारिया प्रकल्पाचं उद्घाटन करणार आहेत. या प्रकल्पात पाटणा जिल्ह्यातल्या मोकामा आणि बेगुसराय यांना जोडणाऱ्या गंगेवरच्या पुलाचा समावेश आहे. हा पूल जुन्या रेल्वे आणि रस्ता वाहतुसाठी उभारलेल्या राजेंद्र सेतू या पुलाला समांतर असेल, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दिली आहे. हा नवीन पूल उत्तर बिहार आणि दक्षिण बिहारच्या जिल्ह्यांमधल्या वाहतुकीचं अंतर कमी करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. प्रधानमंत्री मोदी यांनी या २०१७मध्ये या प...

August 19, 2025 11:20 AM

views 23

चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेणार

भारत दौऱ्यावर असलेले चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. तसंच भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्यासमवेत सीमा प्रश्नावर विशेष प्रतिनिधींच्या चर्चेच्या 24 व्या फेरीत वांग यी सहभागी होणार आहेत.   राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांसोबतच्या बैठकीत सीमेवरील परिस्थिती, व्यापार आणि विमान सेवा पुन्हा सुरू करण्याच्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे. पंतप्रधान मोदी या महिन्याच्या शेवटी तियानजिन इथं होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परि...

August 19, 2025 11:16 AM

views 19

समृद्धीला चालना देण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याची प्रधानमंत्र्यांची ग्वाही

समृद्धीला चालना देण्यासाठी विविध क्षेत्रांमध्ये जलद सुधारणा करण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे, असं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर व्यक्त केलं आहे. अत्याधुनिक सुधारणांच्या आराखडयाचा आढावा घेण्यासाठी काल झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर प्रधानमंत्र्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली, या बैठकीमध्ये सुलभ राहणीमान तसंच व्यवसाय सुलभतेमध्ये सुधारणा करण्यासाठी आणि समावेशक समृद्धीला चालना देण्यासाठीच्या उपाययोजनांना गती देण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आलं.   स्वातंत्र्यदिनाला प्रधानमंत्र्यांनी के...

August 18, 2025 7:46 PM

views 27

राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी घेतली प्रधानमंत्र्यांची भेट

राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचं नाव घोषित झाल्यानंतर ते आज दिल्लीला रवाना झाले. तिथं त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची सदीच्छा भेट घेतली.    राधाकृष्णन हे अनुभव समृद्ध असून, विविध पदांवर काम करताना त्यांनी समाजाची सेवा आणि उपेक्षितांना सक्षम बनवण्यावर भर दिल्याचं प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमांवर लिहिलेल्या संदेशात म्हटलं आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही राधाकृष्णन यांच्या उमेदवारीचं स्वागत केलं आहे....

August 17, 2025 2:07 PM

views 28

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते राजधानी दिल्लीत अकरा हजार कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचं उद्घाटन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज राजधानी दिल्लीत अकरा हजार कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचं उद्घाटन केलं. यात द्वारका द्रुतगती मार्गाचा दिल्ली विभाग आणि शहरी विस्तार रस्ता-२ यांचा समावेश आहे. या प्रकल्पांमुळे वाहतूक सुलभ होऊन  प्रवासाचा वेळ वाचणार आहे. ५ हजार ३६० कोटी रुपये खर्चाच्या द्वारका द्रुतगती मार्गामुळे यशोभुमी,डीएमआरसी ब्ल्यू लाईन आणि ऑरेंज लाईन, बिजवासन रेल्वेस्थानक, द्वारका क्लस्टर बस डेपो जोडले जाणार आहेत.  शहरी विस्तार रस्ता-२ मुळे दिल्लीमधला आणि बाह्य रिंगरोड, मुकरबा चौ...