June 30, 2024 7:53 PM June 30, 2024 7:53 PM

views 10

माजी उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांच्या चरित्रासह दोन पुस्तकांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

माजी उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांच्या चरित्रासह दोन पुस्तकांचं प्रकाशन आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. नायडू यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त दूरचित्रसंवाद माध्यमातून मोदी यांनी पुस्तकांचं प्रकाशन केलं. या पुस्तकांमुळे त्यांचं कार्य लोकांपर्यंत पोहोचेल आणि अनेकांना देशकार्य करण्यासाठी प्रेरणा मिळेल, असं प्रतिपादन मोदी यांनी यावेळी केलं.

June 25, 2024 1:47 PM June 25, 2024 1:47 PM

views 20

राजकीय आणीबाणीचा विरोध करणाऱ्या सर्वांना प्रधानमंत्र्यांकडून आदरांजली

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी १९७५ मध्ये देशात लागू करण्यात आलेल्या राजकीय आणीबाणीचा विरोध करणाऱ्या सर्व स्त्री - पुरुषांना आदरांजली वाहिली आहे. सर्व भारतीयांना सन्मानिय असणाऱ्या संविधानाला अपमानित करत काँग्रेसनं जनतेच्या मुलभूत स्वातंत्र्याचं हनन केलं होतं, याची आठवण करून देणारा हा दिवस असल्याचं, प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावरच्या एका पोस्टमध्ये म्हटलं आहे.

June 24, 2024 5:13 PM June 24, 2024 5:13 PM

views 14

देशवासियांच्या जीवनमानात सुधारणा घडवण्यासाठी सरकार वचनबद्ध – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

एकशे चाळीस कोटी भारतीयांचं जीवनमान सुधारणं हीच रालोआ सरकारच्या लेखी खरी सुधारणा असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात केलं आहे. वस्तू आणि सेवा कर प्रणालीची अंमलबजावणी केल्यापासून अनेक गृहोपयोगी वस्तू स्वस्त झाल्या असून सामान्य माणसाच्या बचतीत भर पडली आहे. देशवासियांच्या जीवनमानात सुधारणा घडवण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे, असं ते म्हणाले. 

June 20, 2024 2:42 PM June 20, 2024 2:42 PM

views 7

सिकलसेल आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार वचनबद्ध

सिकलसेल आजाराशी संबंधित आव्हानांना तोंड देण्यासाठी केंद्र सरकार तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करत असल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. आजच्या जागतिक सिकल सेल दिवसाच्या निमित्तानं समाजमाध्यमावरून दिलेल्या संदेशात या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार वचनबद्द असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी केला आहे. या आजाराचं निदान आणि त्यावरील उपचार अशा विविध पैलूंवर सरकार काम करत असल्याचंही त्यांनी संदेशात म्हटलं आहे.   दरम्यान, या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी त्याचं लवकर निदान करणं, उप...