August 16, 2024 8:04 PM

views 35

इस्राएलचे प्रधानमंत्री बेंजामीन नेतन्याहू यांचा प्रधानमंत्री मोदी यांच्याशी संवाद

इस्राएलचे प्रधानमंत्री बेंजामीन नेतन्याहू यांनी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरुन संवाद साधला आणि पश्चिम आशियातल्या सद्य स्थितीबाबत चर्चा केली. सध्याचा तणाव कमी करणं गरजेचं आहे, असं मोदी यांनी यावेळी सांगितलं. सर्व बंदीवानांची तात्काळ सुटका करण्याचं आवाहन त्यांनी केलं. संवाद आणि राजनितीक मार्गानं संघर्षावर लवकर आणि शांततापूर्व तोडगा काढण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.    भारत-इस्राएल धोरणात्मक भागिदारी अधिक मजबूत करण्यासाठी तसंच उभयपक्षी सहकार्याच्या विविध बाजूंवर दोन्ही ने...

August 16, 2024 8:42 PM

views 29

बांगलादेशातल्या हिंदूंना संरक्षण देण्याची महम्मद युनूस यांची प्रधानमंत्री मोदी यांना ग्वाही

बांगलादेशातल्या हिंदू आणि सर्व अल्पसंख्य़ांकांना संरक्षण दिलं जाईल, अशी ग्वाही बांगलादेशाच्या हंगामी सरकारचे मुख्य सल्लागार महम्मद युनूस यांनी दिली आहे. त्यांनी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरुन संवाद साधला, आणि सद्य स्थितीबाबत चर्चा केली. आपापल्या राष्ट्रीय प्राधान्यांच्या अनुषंगानं उभयपक्षी संबंध पुढं नेण्याच्या मार्गांबाबत दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. लोकशाहीवादी, स्थिर, शांततापूर्ण, आणि प्रागतिक बांगला देशासाठी भारताचा पाठिंबा कायम राहील, असं मोदी यांनी सांगितलं.

August 15, 2024 8:00 PM

views 31

पारशी नववर्ष नवरोजनिमित्त राष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांकडून शुभेच्छा

देशभरात आज नवरोज उत्साहात साजरा केला जात आहे. पारशी बांधवानी अग्यारीत जाऊन या निमित्त प्रार्थना केली आणि सर्वांना शुभेच्छा दिल्या.    राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज पारशी नववर्ष, नवरोजनिमित्त सर्व नागरिकांना, विशेषत: पारशी समाजातल्या लोकांना शुभेच्छा दिल्या आहेत. नवरोज हे आनंद, उत्साह आणि विश्वासाचं प्रतीक असल्याचं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. पारशी समाजानं आपल्या परिश्रमातून देशाच्या विकासात मोठं योगदान दिले आहे असं राष्ट्रपतींनी सांगितलं,   प्रधानमंत्री नरेंद्र मोदी य...

August 15, 2024 7:37 PM

views 27

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जागतिक पातळीच्या नेत्यांचे मानले आभार

स्वातंत्र्य दिनानिमित्त अनेक जागतिक पातळीच्या नेत्यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आभार मानले आहेत. मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मोईज्जू आणि फ्रान्सचे राष्ट्रपती इम्यॅन्युअल मॅक्रॉन यांच्या शुभेच्छांबद्दल मोदी यांनी कृतज्ञता व्यक्त केली. लोकहितासाठी एकत्र काम करण्याविषयी मोदी यावेळी म्हणाले. यासह संयुक्त अरब अमिरातीचे प्रधानमंत्री मोहम्मद बिन राशिद अल मक्तूम तसंच नेपाळ आणि भूतान या देशांच्या प्रधानमंत्र्यांनी दिलेल्या शुभेच्छांचेही प्रधानमंत्री मोदी यांनी आभार मानले आ...

August 15, 2024 7:34 PM

views 130

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंची घेतली भेट !

पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज भेट घेतली. यात कास्य पदक विजेता भारतीय हॉकी संघ, नेमबाज मनू भाकर, स्वप्नील कुसळे, सरबज्योत सिंग, कुस्तीपटू अमन सेहरावत यांचा समावेश होता. नीरज चोप्रा उपचारांसाठी जर्मनी इथं गेल्यामुळे तो या भेटीवेळी अनुपस्थित होता.

August 15, 2024 3:40 PM

views 27

प्रधानमंत्र्यांच्या भाषणात आत्मनिर्भर आणि विकसित भारताच्या संकल्पाचं प्रतिबिंब दिसतं – गृहमंत्री अमित शाह

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात आत्मनिर्भर आणि विकसित भारताच्या संकल्पाचं प्रतिबिंब दिसतं, असं मत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केलं आहे. गेल्या दहा वर्षात झालेल्या विकासातून प्रेरणा घेऊन देशाला पुढे घेऊन जाण्याची वचनबद्धता या भाषणातून दिसते, असंही शाह म्हणाले. सशक्त भारत उभा करण्याची शपथ सर्व भारतीयांनी घेण्याचं आवाहनही त्यांनी केलं.

August 14, 2024 1:02 PM

views 33

अरुणाचल प्रदेशात ६,००० फूट तिरंगा घेऊन निघालेल्या रॅलीचं प्रधानमंत्र्यांकडून कौतुक

हर घर तिरंगा अर्थात घरोघरी तिरंगा अभियाना अंतर्गत अरुणाचल प्रदेशात सहा हजार फूट तिरंगा ध्वज घेऊन निघालेल्या रॅलीचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं. अरुणाचल प्रदेश ही देशभक्तीची भूमी असून राज्याच्या सांस्कृतिक वारशात ते स्पष्टपणे प्रतिबिंबित होतं. असं प्रधानमंत्र्यांनी आपल्या समाजमाध्यमावरल्या संदेशात म्हटलं आहे. घरोघरी तिरंगा अभियानासाठी जनतेचा उत्साह पाहून आपल्याला आनंद होत असल्याचंही ते म्हणाले

August 12, 2024 3:50 PM

views 31

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या २५ तारखेला ‘मन की बात’ मधून देशवासियांशी साधणार संवाद

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या महिन्याच्या २५ तारखेला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून ‌देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ११३ वा भाग असेल. या कार्यक्रमासाठी नागरीकांनी आपल्या सूचना आणि विचार येत्या २३ तारखेपर्यंत १८००-११-७८०० या नि:शुल्क क्रमांकावर, नरेंद्र मोदी ॲप वर किंवा माय जीओव्ही ओपन फोरमवर नोंदवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

August 12, 2024 12:38 PM

views 18

हत्तींच्या संरक्षण आणि संवर्धनाच्या प्रयत्नांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून प्रशंसा

जागतिक हत्ती दिनाच्या निमित्ताने देशात हत्तींच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली. हत्ती हे आपल्या इतिहास आणि संस्कृतीशी जोडलेले आहेत, असं प्रधानमंत्री आपल्या समाजमाध्यमावरल्या संदेशात म्हणाले. हत्तींना राहायला अनुकूल वातावरण मिळण्यासाठी शक्य त्या सर्व सुविधा पुरवण्यासाठी आपण वचनबद्ध असल्याचंही प्रधानममंत्री यांनी सांगितलं. तसंच मागच्या काही वर्षात हत्तींच्या संख्येत वाढ झाल्याबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केलं.

August 11, 2024 6:42 PM

views 22

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पिकांच्या १०९ वाणांच्या वाटपाचा प्रारंभ

देशातल्या शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे असं, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज नवी दिल्लीतल्या कृषी विज्ञान केंद्रात अधिक उत्पादन देणाऱ्या, हवामानाशी जुळवून घेणाऱ्या, आणि जैव संवर्धन करणाऱ्या पिकांच्या १०९ वाणांच्या वाटपाचा प्रारंभ झाला. याबद्दल प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावरून आपल्या भावना व्यक्त केल्या. या वाणांमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल असा विश्वासही त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात व्यक्त केला आहे. २७ फळपिकांसह इतर पिकं मिळ...