August 31, 2024 10:38 AM
21
वाढवण बंदरासह विविध विकास कामांचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रारंभ
पालघर जिल्ह्यात वाढवण इथं ७६ हजार कोटी रुपये खर्चून बांधल्या जाणाऱ्या बंदराचं भूमीपूजन, तसंच २१८ मत्स्यपालन विकास योजनेसह विविध विकास योजनांचं उद्घाटन आणि लोकार्पण आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. हे आशियातल सर्वात मोठं आणि जगातल्या आघाडीच्या १० बंदरांमधलं एक बंदर असेल. वाढवण बंदरामुळे १२ लाख रोजगार निर्माण होतील, मच्छीमार आणि स्थानिकांच्या जीवनमानात अनेक सुधारणा होतील. स्थानिक मच्छीमारांना transponders चं वाटप त्यांनी केलं. हे transponder बोटीवर लावायचे असून याद्वारे संपर...