September 23, 2024 1:31 PM

views 23

बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या भारतीय संघाचं प्रधानमंत्र्यांकडून अभिनंदन

हंगेरीत बुडापेस्ट इथं ४५ व्या  बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये ऐतिहासिक दुहेरी सुवर्णपदकं जिंकणाऱ्या भारतीय संघाचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं आहे. देशाच्या क्रीडाक्षेत्रातल्या पराक्रमाचा हा नवा अध्याय असून हे यश इतर बुद्धिबळ पटूंना प्रेरणा देईल, असं प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावरच्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.

September 22, 2024 8:23 PM

views 25

भारतातून चोरीला गेलेल्या किंवा तस्करी झालेल्या २९७ पुरातन वस्तू अमेरिका भारताला परत करणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने भारतातून चोरीला गेलेल्या किंवा तस्करी झालेल्या २९७ पुरातन वस्तू अमेरिका भारताला परत करणार आहे. लवकरच या वस्तू भारतात परत आणल्या जातील. डेलावेर इथं झालेल्या द्विपक्षीय बैठकीवेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांना यातल्या काही वस्तू दाखवण्यात आल्या. या वस्तू परत केल्याबद्दल प्रधानमंत्र्यांनी बायडेन यांचे आभार मानले.

September 22, 2024 3:54 PM

views 19

सर्वसमावेशक आणि समृद्ध हिंद-प्रशांत क्षेत्र हा क्वाड संघटनेचा प्राधान्यक्रम – प्रधानमंत्री

मुक्त, खुलं, सर्वसमावेशक आणि समृद्ध हिंद - प्रशांत क्षेत्र हा क्वाड संघटनेचा एक सामायिक प्राधान्यक्रमावरचा विषय आहे, आणि त्यासाठी सर्व सदस्य देश वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते काल अमेरिकेत डेलावेर इथं झालेल्या क्वाड देशांच्या शिखर परिषदेच्या उद्घाटन सत्राला संबोधित करताना बोलत होते. सध्या जग तणाव आणि संघर्षानं वेढलेलं असताना ही परिषद होत आहे, अशावेळी क्वाड सदस्य देशांनी सामायिक लोकशाही मूल्यांच्या आधारावर एकत्र काम करणं संपूर्ण मानवतेसाठी खूप महत्वाचं असल्याचं ते...

September 21, 2024 7:30 PM

views 23

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ५ ऑक्टोबर रोजी पोहरादेवीत येणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ५ ऑक्टोबर रोजी पोहरादेवीत येणार आहेत. यावेळी त्यांच्या हस्ते बंजारा विरासत या वास्तुसंग्रहालयाचं लोकार्पण होणार आहे. पालकमंत्री संजय राठोड यांनी आज कार्यक्रम स्थळाची पाहणी केल्यानंतर ही माहिती दिली. या ठिकाणी बंजारा समाज संस्कृती आणि परंपरांचे दर्शन होणार आहे. तसंच दररोज सायंकाळी लेझर, लाईट आणि म्युझिक शो होणार आहेत.

September 20, 2024 8:02 PM

views 28

कारागिर बनण्याऐवजी उद्योजक होण्यावर लक्ष देण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन

समाजातल्या उपेक्षित वर्गातून येणाऱ्या कारागीरांनी फक्त कारागीर होऊन राहू नये, तर त्यांनी उद्योजक म्हणून उभं राहावं, असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. वर्धा इथं प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. आकडेवारीनुसार या योजनेचा सर्वाधिक फायदा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय समुदायांतल्या नागरिकांनी घेतल्याचं मोदी यांनी सांगितल या कार्यक्रमात प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रं आणि पुण्यश्लोक अहि...

September 20, 2024 9:58 AM

views 20

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्यापासून तीन दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्यापासून तीन दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर जात आहेत. तेथील डेलावेअर इथे होणाऱ्या क्वाड देशांच्या परिषदेत ते सहभागी होणार आहेत. या दौऱ्यात प्रधानमंत्री विविध परदेशी अधिकाऱ्यांशी तसंच अमेरिकेतील भारतीय जनसमुदायाशी संवाद साधणार आहेत.

September 18, 2024 5:52 PM

views 21

डोनाल्ड ट्रम्प पुढच्या आठवड्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेणार

अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीतले रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढच्या आठवड्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना भेटणार असल्याचं जाहीर केलं आहे. मिशीगनमधे फ्लींट इथं प्रचार मोहिमेतल्या कार्यक्रमात भारत-अमेरिका व्यापाराविषयी बोलताना त्यांनी ही घोषणा केली. येत्या २१ ते २३ तारखेदरम्यान मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यात ट्रम्प त्यांची भेट घेतील अशी शक्यता आहे. 

September 18, 2024 9:48 AM

views 22

केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयांमुळे समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन होईल – मंत्री अश्विनी वैष्णव

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने गेल्या १०० दिवसांत अनेक मोठे निर्णय घेतले असून त्यामुळे समाजातील प्रत्येक घटकामध्ये सकारात्मक परिवर्तन होईल असं प्रतिपादन माहिती आणि प्रसारण मंत्री, अश्विनी वैष्णव यांनी काल केलं. काल संध्याकाळी डीडी न्यूज या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना ते म्हणाले की, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत तीन कोटी घरे दिली जाणार असून ७० वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना आयुष्मान भारत योजनेअंतर्गत दरवर्षी ५ लाख रुपये मिळणार आहेत. रोजगार निर्मिती सुलभ करण्या...

September 18, 2024 9:41 AM

views 12

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी २१ ते २३ सप्टेंबरदरम्यान अमेरिकेच्या दौऱ्यावर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या महिन्याच्या २१ ते २३ तारखेदरम्यान अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात प्रधानमंत्री २१ सप्टेंबर रोजी डेलावेअरमधल्या विलमिंग्टन इथं होणाऱ्या चौथ्या क्वाड नेत्यांच्या शिखर संमेलनात सहभागी होतील. क्वाड शिखर परिषदेचं यजमानपद भूषविण्याची विनंती अमेरिकेनं भारताला विनंती केली असून, भारतानं २०२५ मध्ये क्वाड शिखर परिषदेचं यजमानपद भूषविण्यास सहमती दर्शविली आहे.   या शिखर परिषदेत क्वाडनं गेल्या वर्षभरात केलेल्या प्रगतीचा आढावा घेण्यात येईल, असं परराष्ट्र मंत्रालयानं...

September 17, 2024 8:19 PM

views 31

प्रयेत्या २१ ते २३ तारखेदरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी करणार अमेरिकेचा दौरा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या २१ ते २३ तारखेदरम्यान अमेरिकेचा दौरा करणार आहेत. २१ तारखेला ते विलमिंग्टनमध्ये आयोजित चौथ्या क्वाड परिषदेत सहभागी होतील. २३ तारखेला अमेरिकेच्या जनरल असेंब्ली भविष्य काळाबाबतच्या शिखर परिषदेत त्यांचं भाषण होणार आहे. या शिखरपरिषदेदरम्यान विविध जागतिक नेत्यांशी त्यांच्या द्विपक्षीय बैठका होणार आहेत.