November 11, 2025 1:11 PM November 11, 2025 1:11 PM
25
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भूतानमध्ये दाखल
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी आज सकाळी भूतानमध्ये दाखल झाले. भूतानचे प्रधानमंत्री त्शेरिंग तोबगे यांनी यांनी मोदी यांचं विमानतळावर स्वागत केलं. भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचूक यांच्या ७० वाढदिवसानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमात प्रधानमंत्री मोदी प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होणार आहेत. भारत आणि भूतान यांनी संयुक्तपणे विकसित केलेल्या एक हजार २० मेगावॅट क्षमतेच्या पुनात्सांग-छू दोन या जलविद्युत प्रकल्पाचं उद्घाटन प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते होणार आहे.