November 24, 2024 7:50 PM

views 10

ओदिशा भारताच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे प्रधानमंत्र्यांचे गौरवोद्गार

ओदिशाला संपन्न सांस्कृतिक वारसा लाभला असून हे राज्य भारताच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावत आहे, असे गौरवोद्गार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काढले. नवी दिल्ली इथं आयोजित ओदिशा पर्व २०२४ या कार्यक्रमात ते बोलत होते. ओदिशाच्या आदिवासी समाजातली एक कन्या द्रौपदी मुर्मू या भारताच्या राष्ट्रपती आहेत, ही सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे प्रेरित होऊन ओदिशातल्या आदिवासींच्या कल्याणासाठी हजारो कोटी रुपयांचे असंख्य प्रकल्प सरकारने सुरू केल्याचंही प्रधानमंत्री यावेळी म्हणाले. या क...

November 24, 2024 6:47 PM

views 5

भारत मंडपम इथं आंतराष्ट्रीय सहकार संघटनेच्या, जागतिक सहकार परिषदेचं उदघाटन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं आंतराष्ट्रीय सहकार संघटनेच्या, जागतिक सहकार परिषदेचं उदघाटन होणार आहे. सहकारातून सर्वांची समृद्धी ही या सहा दिवसीय परिषदेची संकल्पना आहे. संघटनेच्या १३० वर्षांच्या इतिहासात प्रथमच या परिषदेचं आयोजन भारतात केलं जात आहे. या कार्यक्रमात  प्रधानमंत्र्यांच्या हस्ते एका विशेष टपाल तिकिटाचं अनावरण केलं जाणार आहे.  भूतानचे प्रधानमंत्री शेरिंग तोबगे आणि फिजीचे उपप्रधानमंत्री मनोआ कामिकामिका हे देखील या परिषदेला उपस्थित राहणार आह...

November 24, 2024 6:09 PM

views 21

जो देश आपला इतिहास जपतो, त्यांचं भविष्यही सुरक्षित असतं, प्रधानमंत्र्यांचं ‘मन की बात’मध्ये प्रतिपादन

जो देश आपला इतिहास जपतो, त्यांचं भविष्यही सुरक्षित असतं असं प्रधानमंत्री म्हणाले. याच उद्देशानं देशातल्या गावांचा इतिहास जतन करण्यासाठी एक निर्देशिका तयार करायचा प्रयत्न सुरू आहे, प्राचीन काळातील सागरी प्रवासाबद्दलच्या भारताच्या क्षमतेशी संबंधित पुरावे जतन करण्याची मोहीमही सुरू केली आहे, असं त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्र्यांनी आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. हा या कार्यक्रमाचा ११६ वा भाग होता. याच प्रयत्नांचा भाग म्हणून गुजरातमध्ये ल...

November 24, 2024 10:34 AM

views 34

महायुतीचा विजय हा विकासवादाचा, सुशासनाचा आणि सामाजिक न्यायाचा विजय – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

महाराष्ट्रात महायुतीला मिळालेला दणदणीत विजय हा विकासवादाचा, सुशासनाचा आणि सामाजिक न्यायाचा विजय आहे, असं प्रतिपादन पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी केलं. महाराष्ट्र विधानसभा आणि विविध राज्यातल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपाला मोठं यश मिळाल्यानंतर भाजपाच्या दिल्लीतल्या मुख्यालयात काल विजयोत्सव साजरा करण्यात आला; त्यावेळी ते कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. महाराष्ट्रात असत्याचा, घराणेशाहीचा, नकारात्मक विचारांचा पराभव झाला आहे; महाराष्ट्रानं विकसित भारताच्या संकल्पाला आणखी बळकट केल्याचं या यश...

November 22, 2024 8:00 PM

views 11

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नायजेरिया, ब्राझील आणि गयाना या देशांचा दौरा आटोपून मायदेशी परतले

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपला ५ दिवसांचा नायजेरिया, ब्राझील आणि गयाना या देशांचा दौरा आटोपून मायदेशी परतले. प्रधानमंत्र्यांनी या दौऱ्यात विविध नेत्यांबरोबर ३१ द्विपक्षीय बैठका घेतल्या आणि अनौपचारिक चर्चाही केल्या. प्रधानमंत्री ब्राझीलमध्ये १०, गयानामध्ये ९ तर नायजेरियात एका द्वीपक्षीय बैठकीत सहभागी झाले. या दौऱ्यात प्रधानमंत्र्यांनी इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्राबोवो सुबियांतो, पोर्तुगालचे प्रधानमंत्री लुईस मोंटेनेग्रो, ब्रिटनचे प्रधानमंत्री कीर स्टारमर, चिलीचे राष्ट्रपती गॅब्रियल बोरिच आणि अर्जं...

November 22, 2024 7:36 PM

views 23

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी २४ नोव्हेंबरला आकाशवाणीच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या रविवारी आकाशवाणीवरून 'मन की बात' या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहे.हा या कार्यक्रमाचा ११६ वा भाग आहे. मन की बात हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून तसंच आकाशवाणीच्या युट्यूब वर आणि न्यूज ऑन एअर या ॲपवरूनही प्रसारित होणार आहे. हिंदी प्रसारणानंतर लगेचच मराठी अनुवाद प्रसारित केला जाईल. 

November 22, 2024 3:51 PM

views 12

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते जागतिक सहकार संघटनेच्या आंतराष्ट्रीय संमेलनाचं २५ नोव्हेंबरला उद्घाटन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या २५ नोव्हेंबर रोजी जागतिक सहकार संघटनेच्या आंतराष्ट्रीय संमेलनाचं नवी दिल्ली इथे उद्घाटन होणार आहे. यावेळी आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त एका टपाल तिकीटाचं प्रकाशनही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होईल. सहकार मंत्रालयाचे सचिव डॉ. आशिष कुमार भुतानी आणि इफ्को लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. यू. एस. अवस्थी यांनी वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. गेल्या १३० वर्षांत प्रथमच आयसीए अर्थात आंतरराष्ट्रीय सहकार आघाडीच्या बैठकीचं तसंच या संमेलनाचं आयोजन भारतात होत...

November 22, 2024 1:23 PM

views 18

तीन देशांचा दौरा आटोपून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी मायदेशी परतण्यासाठी रवाना

तीन देशांचा दौरा आटोपून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज मायदेशी परत यायला निघाले आहेत. गेल्या दशकभरात झालेला भारताचा प्रवास हा प्रमाण, गती आणि शाश्वततेचा असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्र्यांनी काल गयानामध्ये भारतीय समुदायाला संबोधित करताना केलं. गयानात जॉर्जटाऊन इथल्या नॅशनल कल्चरल सेंटरमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.  भारत लवकरच जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होणार असल्याचा पुनरुच्चार केला. भारतीय तरुणांनी देशाला जगातली तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप परिसंस्था हा लौकिक प्राप्त करून दिला आ...

November 21, 2024 8:01 PM

views 22

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना गयानाकडून ‘द ऑर्डर ऑफ एक्सलन्स’ हा सर्वोच्च सन्मान प्रदान

प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी यांना आज गयाना देशातला सर्वोच्च सन्मान ‘द ऑर्डर ऑफ एक्सलन्स’ प्रदान करण्यात आला. मोदी यांचं दूरदृष्टी असलेलं नेतृत्व, जागतिक पातळीवर विकसनशील देशांच्या हक्कांना त्यांनी मिळवून दिलेलं व्यासपीठ, आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या समुदायासाठी त्यांचं उल्लेखनीय कार्य आणि भारत-गयाना देशांमधले संबंध अधिक दृढ करण्यासाठीची त्यांची कटिबद्धता आदींसाठी मोदी यांना  या सर्वोच्च पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. गयानाच्या स्टेट हाऊस मध्ये आज एका समारंभात गयानाचे अध्यक्ष डॉ. मोहम्मद इरफान अली...

November 19, 2024 8:14 PM

views 26

जी-२० बैठकीदरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची जागतिक नेत्यांशी चर्चा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज रिओ द जानेरो इथं जी-20 परिषदेच्या निमित्तानं, ब्राझीलचे अध्यक्ष लुईझ ईनाचिओ लुलादा सिल्व्हा यांच्याशी चर्चा केली. यावेळी दोन्ही नेत्यांनी ऊर्जा, जैव इंधन, संरक्षण, आणि कृषी इत्यादी विविध क्षेत्रांमधल्या सहकार्यात सुधारणा करण्याबाबत कटीबद्धता व्यक्त केली. भारत आणि ब्राझील यांच्यातल्या द्विपक्षीय संबधांचा व्यापक आढावा या चर्चेत घेतल्याचं प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमांवर सांगितलं आहे.