December 6, 2024 3:21 PM

views 4

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अष्टलक्ष्मी महोत्सवाचं उद्घाटन करणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज दुपारी नवी दिल्ली इथं अष्टलक्ष्मी महोत्सवाचं उदघाटन करणार आहेत. भारत मंडपम इथं तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात ईशान्य भारतातील अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, सिक्कीम आणि त्रिपुरा या आठ राज्यांमधले अडीचशे कारागीर सहभागी होणार आहेत. यात ग्रामीण हाट बाजाराचं आयोजन होणार असून त्यात कारागीर, उद्योजक आणि शेतकरी आपल्या  हस्तकला, हातमाग वस्त्रे, पर्यटन स्थळे तसेच विशेष कृषी उत्पादनांचं प्रदर्शन आणि विक्री करणार आहेत. यात जी आय टॅग मिळालेल्या ३४ उत्पा...

December 5, 2024 8:09 PM

views 11

ऑक्सफर्ड विद्यापीठातले प्रा. सौमित्र दत्ता यांच्याकडून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची प्रशंसा

ऑक्सफर्ड विद्यापीठातले प्राध्यापक सौमित्र दत्ता यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भारतातल्या सुशासनाबद्दल प्रशंसा केली आहे. मोदींच्या नेतृत्वात देश जगातल्या प्रमुख आर्थिक शक्ती बनण्याकडे वेगानं वाटचाल करत असल्यामुळे भारताकडे पाहण्याचा जगाचा दृष्टीकोन बदलला असल्याचंही सौमित्र दत्ता यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं. दत्ता यांनी प्रधानमंत्र्यांच्या प्रगती धोरणाचीही प्रशंसा केली. 

December 3, 2024 7:49 PM

views 20

नवे फौजदारी कायदे भारतीयांना वसाहतवादाच्या मानसिक गुलामगिरीतून मुक्त करतील – प्रधानमंत्री

नव्या फौजदारी कायद्यांची अंमलबजावणी हे देशातल्या नागरिकांसाठी राज्यघटनेत अनुस्यूत असलेल्या आदर्शांची पूर्ती करण्याच्या दिशेनं टाकलेलं ठोस पाऊल आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज हरियाणात चंडीगढ इथं नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीचं लोकार्पण केल्यानंतर बोलत होते. नवे फौजदारी कायदे वसाहतवादाच्या मानसिक गुलामगिरीतून भारतीयांना मुक्त करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या कायद्यांच्या यशस्वी अंमलबजावणी निमित्त त्यांनी नागरिकांचं अभिनंदन केलं. या कार्यात योगदान देणाऱ्...

December 1, 2024 1:39 PM

views 24

सीमा सुरक्षा दलाच्या साठाव्या वर्धापन दिनानिमित्त प्रधानमंत्र्यांकडून कौतुक आणि अभिनंदन

सीमा सुरक्षा दल आज आपला ६० वा वर्धापन दिन साजरा करत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सीमा सुरक्षा दलाच्या कामगिरीचं कौतुक करत वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हे दल म्हणजे धैर्य, समर्पण आणि असामान्य सेवेचं प्रतीक असून या दलाची दक्षता आणि शौर्यानं आपल्या देशाच्या सुरक्षिततेत कायमच महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे, असं प्रधानमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही सीमा सुरक्षा दलाला वर्धापनदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

November 29, 2024 1:22 PM

views 29

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून तीन दिवसांच्या ओडिशा दौऱ्यावर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून तीन दिवसांच्या ओडिशा दौऱ्यावर आहेत. भुवनेश्वर इथं होत असलेल्या पोलिस महासंचालक आणि पोलिस महानिरीक्षकांच्या अखिल भारतीय परिषदेला ते उपस्थित राहणार आहेत. ओडिशा प्रथमच या कार्यक्रमाचं आयोजन करत आहे. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे पोलीस महासंचालक, तसंच केंद्रीय राखीव पोलिस बल, रॉ, एनएसजी, गुप्तचर विभाग आणि एसपीजीचे प्रमुख या परिषदेला उपस्थित राहणार आहे. प्रधानमंत्री मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल या परिषदे...

November 29, 2024 9:46 AM

views 7

तरुणांना उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी संधी देण्यासाठी सरकार वचनबद्ध – प्रधानमंत्री

देशातल्या युवकांना सर्वोच्च स्थानावर पोहचण्यासाठी आणि आपल्या कारकिर्दीत उत्कृष्ट प्रदर्शन करण्यासाठी सर्व आवश्यक संधी देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असं आश्वासन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिल आहे. MyGovIndia संकेतस्थळावर त्यांनी हे आश्वासन दिल. भारतीय युवा शक्तिमध्ये कोणताही चमत्कार करण्याच सामर्थ्य आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

November 27, 2024 7:41 PM

views 28

विकसित भारत युवा नेतृत्व चर्चासत्र या प्रश्नमंजुषेत भाग घेण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन

विकसित भारत युवा नेतृत्व चर्चासत्र या प्रश्नमंजुषेत भाग घेण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तरुणवर्गाला केलं आहे. विकसित भारत ही चारस्तरीय स्पर्धा आहे. यात १५ ते २९ वयोगटातल्या व्यक्तीला भाग घेता येईल. २५ नोव्हेंबर ते ५ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या डिजिटल प्रश्नमंजुषेने या स्पर्धेला सुरुवात होईल.   विकसित भारत हे लक्ष्य साध्य करण्यात तरुणांचा लक्षणीय सहभाग असायला हवा. आपल्या नाविन्यपूर्ण कल्पना सरकारपर्यत पोचवण्यासाठी त्यांना मिळणारी ही मोठी संधी आहे असं सांगत, या स्पर्धेत भाग घेण्याच...

November 26, 2024 7:42 PM

views 30

भारताच्या संविधानानं देशाची प्रत्येक अपेक्षा आणि गरज पूर्ण केली असून, नागरिकांसाठी दीपस्तभांप्रमाणे मार्गदर्शक – प्रधानमंत्री

भारताच्या संविधानानं देशाची प्रत्येक अपेक्षा आणि गरज पूर्ण केली असून, नागरिकांसाठी दीपस्तभांप्रमाणे मार्गदर्शक ठरलं आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज संविधान दिनानिमित्त सर्वोच्च न्यायालयात आयोजित कार्यक्रमात बोलत होते. आपलं संविधान देशाच्या वर्तमान आणि भविष्यासाठीही मार्गदर्शक आहे. गेल्या ७५ वर्षात देशापुढं जी जी आव्हानं उभी राहिली त्यावर मात करण्यासाठी संविधानानं योग्य मार्ग दाखवला. या काळात आणीबाणीसारखे प्रसंग आले, त्यांनाही संविधान सामोरं गेलं. आज जम्मू-कश्मीरमधेही स...

November 25, 2024 7:06 PM

views 14

भविष्यात भारताच्या विकासात सहकार क्षेत्राचा सिंहाचा वाटा असेल, असा प्रधानमंत्र्यांना विश्वास

भविष्यात भारताच्या विकासात सहकार क्षेत्राचा सिंहाचा वाटा असेल, असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केला. नवी दिल्ली इथे भारत मंडपम इथे आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. सहकार क्षेत्र म्हणजे भारतीय संस्कृतीचा पाया आहे, असं ते म्हणाले. भारतात सहकारी संस्थांची संकल्पना ही आता चळवळ बनली आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलं. सहकारी संस्थांना बहुउद्देशीय आणि बळकट बनवण्याचा आपला प्रयत्न करणार असून त्यासाठी दोन लाख गावांमधे सहकारी संस्था स्थापन करण्याचा विचार असल...

November 25, 2024 6:36 PM

views 25

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात विधायक चर्चा होईल- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात विधायक चर्चा होईल, अशी आशा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. ते आज अधिवेशन सुरू होण्याआधी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. भारतानं संविधान स्वीकारून ७५ वर्षे झाली आहेत हे यंदाचं वैशिष्ट्य असून यासह अनेक कारणांसाठी हे अधिवेशन विशेष असेल, असं ते म्हणाले. यावेळी प्रधानमंत्र्यांनी विरोधकांवर टीका केली. मतदारांनी सत्ता द्यायला नकार दिलेले मूठभर लोक संसदेत विनाकारण गोंधळ करतात, असं ते म्हणाले.   संसदेतल्या वेळेचा उपयोग देशाची प्रतिष्ठा जगात वाढवण्यासाठीच  करायला हव...