January 12, 2025 7:30 PM

views 8

प्रधानमंत्री उद्या जम्मू-काश्मीरमध्ये सोनमर्ग बोगद्याचं उद्घाटन करणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या जम्मू आणि काश्मीरमध्ये सोनमर्ग बोगद्याचं उद्घाटन करणार आहेत. सुमारे १२ किलोमीटर लांबीचा सोनमर्ग बोगद्यामुळे लेहला जाण्यासाठी श्रीनगर आणि सोनमर्ग दरम्यान अखंड वाहतूक सुरु रहायला मदत मिळणार आहे. यावेळी प्रधानमंत्री बांधकाम करणाऱ्या कामगारांना भेटतील. यामुळे सोनमर्गमध्ये वर्षभर पर्यटनाला चालना मिळेल आणि स्थानिक लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. तसंच वाहनांचा वेग देखील सरासरी ३० किलोमीटरवरून ७० किलोमीटर प्रति तासापर्यंत वाढणार आहे. 

January 9, 2025 7:59 PM

views 12

जागतिक समस्यांवर उपाय शोधण्यासाठी जग भारताकडे आशेने पाहत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

विविध जागतिक समस्यांवर उपाय शोधण्यासाठी आज जग भारताकडे आशेने पाहत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज दिल्लीत आयोजित जीनोमिक्स डेटा कॉन्क्लेव्हला व्हीडीओ संदेशाद्वारे संबोधित करत होते. जीनोम इंडिया प्रकल्प हा देशाच्या जैवतंत्रज्ञान विषयातला एक निर्णायक प्रकल्प असल्याचं ते म्हणाले. जैवअर्थव्यवस्था शाश्वत विकासाला गती देते आणि गेल्या १० वर्षांत देशाच्या जैवअर्थव्यवस्थेत लक्षणीय वाढ झाली आहे. २०१४ मध्ये देशाची जैवअर्थव्यवस्था १० अब्ज डॉलर्स इतकी होती, ती गेल्या आता दीडशे अब्ज...

January 9, 2025 1:33 PM

views 21

भारतीय समुदाय जगभर उत्तम कामगिरी करत असून देशाला त्याचा अभिमान आहे-प्रधानमंत्री

  भारतीय समुदाय जगभर उत्तम कामगिरी करत असून देशाला त्याचा अभिमान आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज ओदिशामध्ये भुवनेश्वर इथं १८ व्या प्रवासी भारतीय दिवस संमेलनाचं औपचारिक उदघाटन करताना बोलत होते. प्रवासी भारतीय दिवस संमेलन, हा केंद्रसरकारचा महत्वाकांक्षी कार्यक्रम, परदेशात स्थायिक झालेल्या भारतीय समुदायाला परस्परांच्या संपर्कात येऊन संवाद साधण्यासाठी महत्वाचं व्यासपीठ प्रदान करतो. भारतीय समुदायाच्या पर्यटनासाठी खास तयार करण्यात आलेल्या ‘प्रवासी भारतीय एक्स्प्रेस’ला प्रधान...

January 8, 2025 8:48 PM

views 9

आंध्रप्रदेशात २ लाख कोटी रुपये खर्चाच्या विविध प्रकल्पांचा प्रधानमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ

आंध्र प्रदेशात, सुमारे  २ लाख कोटी रुपये खर्चाच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विशाखापट्टणम इथून करण्यात आलं. आंध्र विद्यापीठाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर आयोजित सभेला प्रधानमंत्र्यांनी संबोधित केलं. ‘आजचा दिवस हा आंध्र प्रदेशासाठी महत्वाचा आहे कारण हरित ऊर्जेसाठी पुढाकार आणि पायाभूत सोयीसुविधा विकसित करण्यासाठीचे प्रकल्प उभे राहत आहेत’, असं प्रधानमंत्री म्हणाले.   आंध्र प्रदेशच्या विकासाकरिता केंद्र सरकार वचनबद्ध आहे ...

January 7, 2025 7:00 PM

views 7

डेटा सुरक्षा नियमच्या मसुद्यामुळे भारताची नागरिक केंद्री सुशासनाप्रती वचनबद्धता अधोरेखित-प्रधानमंत्री

डिजिटल वैयक्तिक डेटा सुरक्षा नियम २०२५ च्या मसुद्यामुळे भारताची नागरिक केंद्री सुशासनाप्रती वचनबद्धता अधोरेखित होते असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लिहिलेल्या पोस्टला ते उत्तर देत होते. या नियमावलीमुळे केवळ वैयक्तिक डेटाचेच संरक्षण नव्हे तर प्रगती आणि सर्वसमावेशकतेलाही प्रोत्साहन मिळेल, असं त्यांनी म्हटलं आहे.     इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने तयार केलेल्या या नियमावलीच्या मसुद्यावर जनतेच्या ...

January 7, 2025 8:59 AM

views 21

रेल्वेच्या प्रगतीमुळे विकसित भारताचं उद्दिष्ट लवकर पूर्ण होईल -प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

रेल्वेच्या प्रगतीमुळे विकसित भारताचं उद्दिष्ट लवकरच पूर्ण होईल असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. रेल्वेशी संबंधित विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन काल मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झालं, त्यावेळी ते बोलत होते. विविध चार निकषांच्या आधारावर रेल्वेचा विकास करत असल्याचं प्रधानमंत्र्यांनी नमूद केलं. ते म्हणाले.. ‘‘भारत मे रेलवे के विकास को हम चार पॅरामिटर्स पर आगे बढा रहे है। पहला रेलवे के इन्फ्रास्ट्रक्चर का मॉडर्नायझेशन। दुसरा रेलवे के यात्रियों को आ...

January 6, 2025 12:43 PM

views 16

जागतिक स्तरावर आरोग्याची राजधानी होण्याची भारताची क्षमता – प्रधानमंत्री

जागतिक स्तरावर चांगल्या आरोग्य आणि वैद्यकीय सुविधा देणारी आरोग्याची राजधानी होण्याची क्षमता भारताकडे आहे, मेक इन इंडियाच्या धर्तीवर, जग लवकरच हील इन इंडिया हा मंत्र स्वीकारेल असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. दिल्लीत, केंद्रीय आयुर्वेद संशोधन संस्थेच्या नव्या इमारतीची पायाभरणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते काल दूरस्थ पद्धतीने करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. देशातल्या प्रत्येक नागरिकांपर्यंत आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यावर सरकारने लक्ष केंद्रीत केलं असून, आयुष आणि ...

January 5, 2025 8:16 PM

views 11

भारत लवकरच जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल असा प्रधानमंत्र्यांना विश्वास

भारत लवकरच जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज राजधानी दिल्लीत रेल्वे, मेट्रो आणि आरोग्याशी संबंधित १२ हजार २०० कोटी रुपयांच्या योजनांचं उद्घाटन आणि लोकार्पण झालं, त्यानिमत्तानं रोहिणी इथं झालेल्या कार्यक्रमला ते संबोधित करत होते. येत्या २५ वर्षांत भारत विकसित देश झालेला आपण पाहू असं सांगून, दिल्लीला या विकसित देशाची राजधानी म्हणून अधिक विकसित करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.   भारताती...

January 3, 2025 4:28 PM

views 20

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते दिल्लीत विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दिल्लीत विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी करण्यात आली. जेजे क्लस्टर्समध्ये राहणाऱ्यांसाठी नव्यानं बांधण्यात आलेल्या जवळपास सतराशे सदनिकांचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं, तसंच राष्ट्रीय राजधानीच्या अशोक विहार भागातील पात्र लाभार्थींना या घरांच्या चाव्याही सुपूर्द केल्या. कार्यक्रमापूर्वी प्रधानमंत्र्यांनी झोपडीवासियांसाठी बांधलेल्या नव्या सदनिकांची पाहणी केली तसंच स्थानिकांशी संवाद साधला. दिल्ली विद्यापीठाच्या जवळपास सहाशे कोटी रुपये खर्चाच्या...

January 1, 2025 8:39 PM

views 26

शेतकऱ्यांच्या समृद्धी आणि कल्याणासाठी केंद्रसरकार वचनबद्ध – प्रधानमंत्री

शेतकऱ्यांच्या समृद्धी आणि कल्याणासाठी केंद्रसरकार वचनबद्ध असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने आज घेतलेल्या निर्णयांसंदर्भात त्यांनी  सांगितलं, की देशासाठी अन्न पिकवणाऱ्या शेतकऱ्यांचा देशवासियांना अभिमान  आहे.