February 27, 2025 9:10 PM

views 23

महाकुंभ हा देशाच्या एकतेचा महायज्ञ असल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे गौरवोद्गार

महाकुंभ हा देशाच्या एकतेचा महायज्ञ असून देशाला त्याच्या हजारो वर्षाच्या परंपरेचा गर्व आहे. देश एका नव्या ऊर्जेसह पुढे जात आहे,  असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रयागराजमध्ये महाकुंभाची सांगता झाल्यानंतर आज प्रधानमंत्र्यांनी आपल्या भावना त्यांच्या समाजमाध्यमावरच्या ब्लॉगमध्ये व्यक्त केल्या. देशाचं नवं भविष्य लिहिण्याचा हा काळ आहे. महाकुंभाला आलेले कोट्यावधी लोक हा केवळ एक विक्रम नसून तो समृद्ध भारतीय परंपरेचा पाया आहे. येणाऱ्या शतकांमध्ये देशाची परंपरा आणि भारतीय संस्कृती अधिक सम...

February 25, 2025 1:19 PM

views 42

विकसित भारताकडे वाटचाल करणारी धोरणं सरकार राबवत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

बदलत्या भूराजकीय आणि आर्थिक परिस्थितीत साऱ्या जगाचं लक्ष भारतावर केंद्रीत झालं असून विकसित भारताच्या उद्दिष्टाकडे वाटचाल करणारी धोरणं सरकार राबवत असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ॲडवांटेज आसाम या गुंतवणूकदार संमेलनाच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन केल्यानंतर आज गुवाहाटी इथं ते बोलत होते.   कारखाना क्षेत्राची वाढ आणि रोजगारनिर्मिती याकरता आवश्यक पायाभूत सोयी सुविधा आणि उद्योगांना अनुकूल वातावरण देण्यासाठी केंद्रसरकार वचनबद्ध असल्याचं ते म्हणाले. पूर्वेकडच्या देशांबर...

February 25, 2025 1:19 PM

views 24

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते ऍडव्हान्टेज आसाम परिषदेचं उद्घाटन होणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आसाममधल्या गुवाहाटी इथं आज ऍडव्हान्टेज आसाम या गुंतवणूक आणि पायाभूत सुविधाविषयक परिषदेचं उद्घाटन होणार आहे. उद्घाटन समारंभाला परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर, केंद्रिय जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल, आसामचे राज्यपाल एल. पी. आचार्य आणि मुख्यमंत्री हिमंता बिस्व सर्मा उपस्थित राहणार आहेत. दोन दिवसांच्या या परिषदेत आयोजित विविध सत्रांमध्ये औद्योगिक सुधारणा, जागतिक व्यापार भागीदारी आणि आसाममधील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रावर भर...

February 24, 2025 1:52 PM

views 15

संपूर्ण जग भारताकडे आशेने बघत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच संपूर्ण जग भारताकडे आशेने बघत आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं.  मध्यप्रदेशात भोपाळ इथं आज जागतिक गुंतवणूकदार परिषदेचं उद्धाटन त्यांनी केलं, त्यावेळी ते बोलत होते.  भारत ही सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे, असं जागतिक बँकेपासून सर्व महत्वाच्या संस्थाचं म्हणणं असल्याचं त्यांनी सांगितलं.     जगाला भारताबद्ल वाटणाऱ्या खात्रीमुळे देशाचा आत्मविश्वास वाढला आहे, विकसित भारतात वस्त्रोद्योग, पर्यटन आणि तंत्रज्ञान या क्षेत्रांना महत्व आलं आहे, ...

February 24, 2025 9:10 AM

views 26

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून आसामच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज दुपारपासून आसामच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यादरम्यान प्रधानमंत्री आज गुवाहाटीतील झुमोईर बिनदिनी कार्यक्रमात सहभागी होतील. उद्या त्यांच्या हस्ते 'अॅडव्हान्टेज आसाम २.० या गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा परिषदेचं उद्घाटन होणार आहे. गुवाहाटीत दाखल झाल्यानंतर प्रधानमंत्री आज संध्याकाळी सरुजाई स्टेडियममध्ये भव्य झुमुर नृत्य सादरीकरणाच्या कार्यक्रमात सहभागी होतील. ८,५०० हून अधिक चहाच्या मळ्यांमध्ये काम करणारे मजूर वर्गातील कलाकार हे झुमुर नृत्य सादर करणार आहे...

February 23, 2025 7:28 PM

views 16

AI मध्ये युवकांचा वाढता सहभाग नव्या क्रांतीला जन्म देत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

अंतराळ क्षेत्र तसंच कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातला भारतीय युवकांचा वाढता सहभाग नव्या क्रांतीला जन्म देत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांनी आकाशवाणीवर ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज जनतेशी संवाद साधला. हा या कार्यक्रमाचा ११९वा भाग होता. नवनवीन तंत्रज्ञान स्वीकारून त्याचा अवलंब करण्यात भारतातील लोक कोणापेक्षाही मागे नसल्याचं ते म्हणाले.    गेल्याच महिन्यात इस्रोचं शंभरावं रॉकेट प्रक्षेपण झाल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं.     इसरोच...

February 23, 2025 1:35 PM

views 11

प्रधानमंत्री आजपासून पुढील तीन दिवस मध्यप्रदेश, बिहार आणि आसामच्या दौऱ्यावर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून पुढचे तीन दिवस मध्यप्रदेश, बिहार आणि आसाम या राज्यांचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात त्यांच्या हस्ते आज दुपारी मध्यप्रदेशच्या छत्रपूर जिल्ह्यात बागेश्वर धाम वैद्यकीय आणि विज्ञान संशोधन संस्थेची पायाभरणी केली जाणार आहे. या कर्करोग रुग्णालयात अत्याधुनिक यंत्रं आणि निष्णात डॉक्टरांकडून वंचित वर्गातील कॅन्सर रुग्णांवर मोफत उपचार केले जाणार आहेत. प्रधानमंत्री भोपाळ इथं दोन दिवसीय जागतिक गुंतवणूकदार परिषदेचंही उद्घाटन करणार आहेत.

February 21, 2025 1:31 PM

views 16

सोल लीडरशिप कॉन्क्लेव्हच प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

जागतिक पातळीवरचे कल लक्षात घेऊन भारतीय पद्धतीचा अवलंब करणारं नेतृत्त्व भारताला गरजेचं असल्याचं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केलं. आज नवी दिल्लीत पहिल्या स्कूल ऑफ अल्टिमेट लीडरशीप - सोल परिषदेच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते.   भारत जागतिक स्तरावर एक शक्तिशाली केंद्र म्हणून उदयाला येत असून देशाला प्रत्येक क्षेत्रात कार्यक्षम नेतृत्वाची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. स्कूल ऑफ अल्टिमेट लीडरशिपची स्थापना ही विकसित भारताच्या दिशेनं एक महत्त्वाचं पाऊल असून राष्ट्रीय आणि जागतिक स्...

February 19, 2025 9:31 AM

views 21

गुजरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला यश, प्रधानमंत्र्यांनी मानले आभार

गुजरातमधल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत भाजपानं निर्विवाद यश मिळवलं आहे. भाजपानं 68 पैकी 60 नगरपालिकांवर विजय मिळवला आहे. समाजवादी पक्षाला 2 जागा मिळाल्या असून कॉँग्रेसला एका जागेवर समाधान मानावं लागलं आहे. जुनागड महानगरपालिकेत भाजपानं 60 पैकी 48 जागा जिंकल्या आहेत. भाजपानं 16 तारखेला मतदान झालेल्या तीनही ग्रामपंचायतींवरही विजय मिळवला. 213 जागांवर भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आले. या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या जनतेचे आभार मानले आहेत.

February 16, 2025 8:58 AM

views 16

‘भारत’ जागतिक चर्चांचं नेतृत्व करत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

भारत केवळ भविष्याबद्दलच्या जागतिक चर्चेच्या केंद्रस्थानी नसून या चर्चांचं नेतृत्वही करत आहे; असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत एका शिखर परिषदेला संबोधित करताना म्हणाले, जागतिक स्तरावर भारताला पूर्वी कधीही मिळालं नव्हतं असं स्थान मिळालं आहे. प्रमुख राष्ट्र किंवा जागतिक व्यासपीठाचा भारतावरील विश्वास पूर्वीपेक्षा अधिक मजबूत झाला आहे. भारत पहिल्या तीन औद्योगिक क्रांती चुकला परंतु चौथ्या वर्षात जगासोबत पुढे जाण्याकरता भारत तयार आहे. येत्या काळात भारत जगातली तिसरी सर्वात मोठी...