November 21, 2025 7:50 PM November 21, 2025 7:50 PM
15
G20 शिखर परिषदेसाठी प्रधानमंत्री मोदी दक्षिण आफ्रिकेत दाखल
जी ट्वेंटी नेत्यांच्या तीन दिवसीय शिखर परिषदेसाठी प्रधानमंत्री आज दक्षिण आफ्रिकेत जोहान्सबर्ग इथं पोहोचले. ते या परिषदेच्या सर्व सत्रांमध्ये सहभागी होऊन शाश्वत विकास, वातावरण बदल कृती कार्यक्रम, जागतिक शासकीय सुधारणा इत्यादींसह भारताचा प्राधान्यक्रम मांडतील. या परिषदेदरम्यान प्रधानमंत्री दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरील रामाफोसा तसंच इतर अनेक जागतिक नेत्यांच्या गाठीभेटी घेतील. इब्सा अर्थात भारत-ब्राझील-दक्षिण आफ्रिका यांच्या नेत्यांच्या बैठकीतही ते सहभागी होतील. दृढ ऐक्य, समानता आणि शाश्वतत...