June 18, 2025 8:45 PM

views 29

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी क्रोएशियात दाखल

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज क्रोएशियामधल्या झग्रेब शहरात पोहोचले. क्रोएशियाचे प्रधानमंत्री आंद्रेज प्लेनकोविच यांनी विमानतळावर त्यांचं स्वागत केलं. यावेळी प्रधानमंत्री मोदी यांच्या स्वागतासाठी स्थानिक कलाकारांनी पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.    प्रधानमंत्री नरेंद्र मोदी क्रोएशियाचे प्रधानमंत्री आंद्रेज प्लेनकोविच यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा करणार आहेत. तसंच दोन्ही नेते मार्क्स स्क्वेअर इथल्या स्वागत समारंभात सहभागी होतील. या भेटीत दोन्ही देशात महत्त्वाच्या क्षेत्रात करार ह...

June 17, 2025 8:11 PM

views 14

प्रधानमंत्री मोदी कॅनडामध्ये कनानास्किस इथं होणाऱ्या G-7 शिखर परिषदेत सहभागी होणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कॅनडाच्या दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी आज कॅलगरी इथं पोहोचले. कनानास्किस इथं आयोजित G-7 शिखर परिषदेत ते सहभागी होत आहेत. ऊर्जा संरक्षण, तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक या मुद्द्यांवर या परिषदेत चर्चा होईल. प्रधानमंत्री मोदी सहाव्यांदा G-7 शिखर परिषदेत सहभागी होत आहेत.  कॅनडाचे प्रधानमंत्री मार्क कार्नी यांच्यासह सदस्य देशांच्या इतर नेत्यांबरोबर प्रधानमंत्री द्विपक्षीय चर्चा करतील. भारत आणि कॅनडाचे संबंध वृद्धिंगत करणं हा या भेटीचा मुख्य हेतू आहे. त्यानंतर प्रधानमंत...

June 12, 2025 2:55 PM

views 15

डिजिटल इंडिया उपक्रमामुळे गेल्या ११ वर्षांत तरुणवर्ग नवोन्मेषासाठी सक्षम बनला – प्रधानमंत्री

तंत्रज्ञानाच्या प्रगतीत आणि देशाच्या आत्मनिर्भरतेला चालना देण्यात भारताच्या तरुण नवोन्मेषकांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांचं कौतुक केलं आहे. रालोआ सरकारने सुरू केलेल्या डिजिटल इंडिया उपक्रमामुळे गेल्या ११ वर्षांत तरुणवर्ग नवोन्मेषासाठी सक्षम बनला आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर तंत्रज्ञान महासत्ता म्हणून भारताचं स्थान बळकट झालं आहे, असं प्रधानमंत्री आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हणाले आहेत.   तंत्रज्ञानाच्या शक्तीच्या वापराचे असंख्य फायदे झाले आहेत. त...

June 11, 2025 8:33 PM

views 32

कल्याणकारी विकासासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

कल्याणकारी विकासासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज म्हटलं आहे. कामगार आणि रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांच्या समाजमाध्यमावरच्या संदेशाला उत्तर देताना प्रधानमंत्र्यांनी,  सरकारनं सुरू केलेल्या विविध कल्याणकारी योजना जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचतील, याची खात्रीही दिली.    भारताचं सामाजिक सुरक्षा कवच गेल्या दहा वर्षांमध्ये १९ टक्क्यांवरून ६४ पूर्णांक ३ दशांश टक्क्यापर्यंत वाढलं आहे. आयलोस्टॅट या आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या...

June 11, 2025 11:02 AM

views 21

बहुपक्षीय शिष्टमंडळाचा देशाला अभिमान – प्रधानमंत्री

पेहलगाम दहशतवादी हल्ला आणि त्याला प्रत्युत्तरादाखल राबवलेलं ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर दहशतवादाचं उच्चाटन करण्याची गरज याबाबत भारताची भुमिका स्पष्ट करण्यासाठी विविध देशांत गेलेल्या बहुपक्षीय शिष्टमंडळाचा आपल्याला अभिमान असल्याचे गौरवोद्गार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल काढले.   नवी दिल्लीत या शिष्टमंडळाची भेट घेतली आणि त्यांच्या अनुभवांबद्दल संवाद साधला. या प्रतिनिधींनी विविध 33 देशांतील राजधानीच्या ठिकाणांना भेट दिली आणि राजकीय तसंच सामाजिक स्तरावरील व्यक्तींशी संवाद साधला. दहशत...

June 10, 2025 1:35 PM

views 21

देशाच्या संरक्षण क्षेत्रात लक्षणीय बदल झाल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

गेल्या ११ वर्षांत देशाच्या संरक्षण क्षेत्रात लक्षणीय बदल झाल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. देशानं आधुनिकीकरण आणि संरक्षण उत्पादनाच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यावर लक्ष केंद्रित केलं आहे. देशाचे नागरीक आपल्या देशाला अधिक मजबूत बनवण्याचा संकल्प घेऊन एकत्र आल्याचं पाहून आनंद होत असल्याचं मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.

June 9, 2025 1:36 PM

views 27

१४० कोटी भारतीयांच्या सहभागामुळे देशाने विविध क्षेत्रांमध्ये परिवर्तन घडवून आणलं – प्रधानमंत्री

गेल्या ११ वर्षांत १४० कोटी भारतीयांच्या सामूहिक सहभागामुळे देशाने विविध क्षेत्रांमध्ये परिवर्तन घडवून आणलं आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास हे तत्व अंगिकारून रालोआ सरकारने आर्थिक वाढीपासून ते सामाजिक उन्नतीपर्यंतची मजल मारली आहे.   गेल्या अकरा वर्षांत सरकारने लोककेंद्री आणि सर्वांगीण प्रगतीला प्राधान्य दिल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपल्या संदेशात म्हणाले आहेत. जनधन योजनेतून ५५ कोटी ...

June 8, 2025 6:46 PM

views 30

गेल्या ११ वर्षांत महिलांच्या विकासावर रालोआ सरकारचं लक्ष केंद्रीत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

विकसित भारताच्या दिशेने महिलांनी परिवर्तनकारी भूमिका बजावली असून गेल्या ११ वर्षांत महिलांच्या विकासावरच रालोआ सरकारचं लक्ष केंद्रित असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. महिलांनी गेल्या ११ वर्षांत विज्ञान, शिक्षण, क्रीडा, स्टार्टअप्स, सशस्त्र दलं यांसह सर्व क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून सर्वांना प्रेरणा दिल्याचं त्यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.    सेवा, सुशासन आणि गरीबांचं कल्याण या तत्वांनी प्रेरित झालेल्या भारताने गेल्या दशकात उल्लेखनीय परिवर्तन ...

June 7, 2025 11:25 AM

views 49

जम्मूकाश्मिरमधील विकास प्रकल्पांमुळे राज्याला नवी गती मिळेल- प्रधानमंत्री

जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरू असलेले विकास प्रकल्प राज्याच्या विकासाला नवीन गती देतील असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल व्यक्त केला. जम्मू आणि कश्मीरमध्ये 46 हजार कोटी रुपये खर्चाच्या विविध पायाभूत प्रकल्पांचं उद्घाटन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते.   यावेळी उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे प्रकल्पाचं राष्ट्रार्पणही प्रधानमंत्र्यांनी केलं. तसंच या प्रकल्पांतर्गत येणाऱ्या, जगातल्या सर्वात उंचीवरच्या चिनाब रेल्वे पुलाचं उद्घाटनही त्यांनी केलं. देशातला सर्वात ...

June 7, 2025 11:11 AM

views 28

कॅनडात होणाऱ्या जी-7 शिखर परिषदेत प्रधानमंत्री उपस्थित राहाणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या महिन्याच्या शेवटी कॅनडामध्ये होणाऱ्या जी-7 शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत. कॅनडाचे प्रधानमंत्री मार्क कार्नी यांनी काल दूरध्वनीद्वारे मोदी यांच्याशी संवाद साधत या परिषदेचं निमंत्रण दिलं.   तर मोदी यांनी या परिषदेसाठी आमंत्रित केल्याबद्दल त्यांचे आभार मानले तसंच मोदींनी कार्नी यांना नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मिळालेल्या विजयाबद्दल त्यांचं अभिनंदन केलं. भारत आणि कॅनडा परस्पर आदर आणि हितसंबंधांना लक्षात घेत नव्या जोमानं एकत्र काम करतील असा विश्वास मोदी यांनी व्...