December 20, 2025 10:05 AM December 20, 2025 10:05 AM

views 7

प्रधानमंत्री आज पश्चिम बंगाल आणि आसाम दौऱ्यावर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या भेटीत ते नदिया जिल्ह्यातील राणाघाट इथं सुमारे 32 शे कोटी रुपयांच्या विकासकामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन करणार आहेत. महामार्ग आणि रस्ते प्रकल्पांचा यामध्ये समावेश आहे. पश्चिम बंगालनंतर प्रधानमंत्री दोन दिवसांच्या आसाम दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते सुमारे 15 हजार 600 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी करतील. प्रधानमंत्री आज गुवाहाटी इथल्या लोकप्रिय गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अत्याधुनिक बांबू...

December 17, 2025 8:18 PM December 17, 2025 8:18 PM

views 38

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं इथिओपियाच्या संसदेत भाषण

“ग्लोबल साऊथ स्वतःचं भविष्य घडवत आहे,  भारत आणि इथियोपिया या दोन्ही देशांकडे त्या संदर्भातल्या संकल्पना आहेत”, असं प्रतिपादन  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी  यांनी आज केलं.  प्रधानमंत्र्यांनी आज  इथियोपियाच्या संसदेला संबोधित केलं. इथियोपियाला सिंहाची भूमी असं संबोधून भारतातील गुजरात हीसुद्धा सिंहाची भूमी म्हणून ओळखली जाते असं सांगत,  भारत आणि इथियोपियामधील  हवामानासह अनेक साम्य प्रधानमंत्र्यांनी यावेळी अधोरेखित केली.  वी द पीपल हे शब्द  भारतीय संविधानाच्या सुरवातीला आहेत तर इथिओपियाचं संविधान वी द न...

December 13, 2025 1:16 PM December 13, 2025 1:16 PM

views 25

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या सोमावरपासून ३ देशांच्या दौऱ्यावर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या सोमवारपासून जॉर्डन, इथिओपिया आणि ओमान या तीन देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते, जॉर्डनचे राजे अब्दुल्ला बिन अल हुसेन यांच्या निमंत्रणावरून येत्या 15 ते 16 डिसेंबर दरम्यान जॉर्डनला भेट देतील. भारत हा जॉर्डनचा तिसरा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. तर 16 ते 18 डिसेंबर दरम्यान मोदी आधी  इथिओपियाला आणि नंतर ओमानला भेट देणार आहेत.

December 8, 2025 8:21 PM December 8, 2025 8:21 PM

views 7

दूरदर्शनच्या ‘सुप्रभातम’ कार्यक्रमाची प्रधानमंत्र्यांकडून प्रशंसा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दूरदर्शनवरून प्रसारित केल्या जाणाऱ्या ‘सुप्रभातम’ या कार्यक्रमाची प्रशंसा केली आहे. योगापासून भारतीय जीवनशैलीपर्यंत विविध पैलूवर चर्चा घडवून आणणारा हा कार्यक्रम रोजची सकाळ तजेलदार बनवतो, असं मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. ‘सुप्रभातम’ हा अर्ध्या तासाचा कार्यक्रम सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ वाजता डी डी न्यूज या वाहिनीवरून प्रसारित केला जातो. 

December 8, 2025 7:08 PM December 8, 2025 7:08 PM

views 51

Lok Sabha : लोकसभेत ‘वंदे मातरम’वर चर्चा

समृद्ध भारताची भावना वंदे मातरम् मुळे फलद्रुप होईल, असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी वर्तवला आहे.  लोकसभेत आज वंदे मातरम गीतावरच्या चर्चेला सुरूवात करताना ते बोलत होते. ज्या वंदे मातरम् मंत्राने स्वातंत्र लढ्यासाठी प्रेरणा दिली, तोच मंत्र समृद्धतेचीही प्रेरणा देईल, असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केला. वंदे मातरम् ही फक्त स्मरण करण्याची बाब नव्हे तर संस्कृतीच्या अखंड प्रवाहाचं प्रतिबिंब असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. आपल्यावर वंदे मातरम् चं ऋण असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. ...

December 3, 2025 12:32 PM December 3, 2025 12:32 PM

views 38

प्रधानमंत्र्यांच्या नवी दिल्लीतल्या निवासस्थानाचं नामकरण

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नवी दिल्लीतल्या निवासस्थानाचं नामकरण सेवा तीर्थ असं करण्यात आलं आहे. तसंच राजभवन आणि राजनिवास यांची नावं लोकभवन आणि लोकनिवास अशी करण्यात आल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलं. विकसित भारत निर्माण करण्याच्या प्रवासात हे एक महत्त्वाचं पाऊल असल्याचं शहा म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार हे सत्तेचं नाही तर सेवेचं प्रतीक असून प्रधानमंत्री स्वतःला सेवक म्हणवून घेतात असं ते म्हणाले. 

December 1, 2025 1:25 PM December 1, 2025 1:25 PM

views 22

संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी प्रधानमंत्र्यांचं संबोधन…

हिवाळी अधिवेशन ही फक्त एक औपचारिकता नसून त्याद्वारे देशाला विकासाकडे नेण्याच्या प्रयत्नांना चालना मिळते, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी ते वार्ताहरांना संबोधित करत होते. भारताचा आजचा आर्थिक विकास उल्लेखनीय आहे. या वाढीमुळे भारताला विकसित राष्ट्र बनण्याच्या मार्गावर चालण्याचा आत्मविश्वास आणि बळ मिळालं आहे, असं मोदी म्हणाले.    १८व्या लोकसभेचं हे सहावं अधिवेशन आजपासून सुरू होत असून सर्व संसद सदस्य त्यांच्या सक्रिय सहभागाद्वारे लोकशाहीची...

November 29, 2025 7:03 PM November 29, 2025 7:03 PM

views 13

प्रधानमंत्री मोदी उद्या मन की बातमधून संवाद साधणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या रविवारी सकाळी ११ वाजता आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा १२८वा भाग असेल. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शन नेटवर्क, वेबसाइट तसंच न्यूजऑनएयर मोबाइल ॲपवर प्रसारित केला जाईल.

November 29, 2025 1:20 PM November 29, 2025 1:20 PM

views 32

पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षकांच्या परिषदेत प्रधानमंत्री भाग घेणार

छत्तीसगडमधे रायपूर इथं आयोजित करण्यात आलेल्या पोलिस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षकांच्या परिषदेला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज आणि उद्या उपस्थित राहणार आहेत. परिषदेच्या विविध सत्रांचे अध्यक्षस्थान ते भूषवतील तसंच विशिष्ट सेवेसाठीची राष्ट्रपती पोलिस पदकं विजेत्यांना  प्रदान करतील.   दतीन दिवस चालणाऱ्या या परिषदेचं उद्घाटन  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या  हस्ते काल या झालं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, डीजीपी आणि आयजीपी परिषद देशाच्या अंतर्गत सुरक्षेच्या आव्हानांचे नि...

November 28, 2025 1:33 PM November 28, 2025 1:33 PM

views 18

प्रधानमंत्री मोदी ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या माध्यमातून संवाद साधणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या रविवारी सकाळी ११ वाजता आकाशवाणीवर मन की बात कार्यक्रमाच्या १२८ व्या भागात  देश-विदेशातल्या श्रोत्यांशी संवाद साधतील. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शन नेटवर्क, वेबसाइट तसंच न्यूज़ऑनएयर मोबाइल ऐपवर प्रसारित केला जाईल. आकाशवाणीवरच्या  हिंदीतल्या  प्रसारणानंतर प्रादेशिक भाषांमध्येही  कार्यक्रमाचं प्रसारण होईल.