June 19, 2024 1:12 PM

views 19

प्रधानमंत्री मोदी यांनी कल्याणकारी काम केल्यानं तिसऱ्यांदा शपथ घेतली – राज्यमंत्री डॉ.एल मुरुगन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महिला, युवक आणि गरीबांच्या कल्याणासाठी भरीव काम केल्यानं सलग तिसऱ्यांदा शपथ घेतली, असं माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल मुरुगन यांनी सांगितलं. तामिळनाडूतल्या तिरुवन्नलमलाईमध्ये ते बातमीदारांशी बोलत होते.   नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्रीपदाची तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर सर्वात आधी त्यांनी शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधीचा सतरावा हप्ता वितरीत केल्यानं शेतकऱ्यांना मोठी आर्थिक मदत  झाल्याचं मुरुगन यांनी सांगितलं. या योजनेमुळे शेतकऱ्यांना शेतीच्...

June 19, 2024 8:49 PM

views 30

देशाला २०४७पर्यंत विकसित करण्यात ज्ञान महत्त्वाची भूमिका बजावेल – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

२०४७ पर्यंत देशाला विकसित करण्यात ज्ञान महत्त्वाची भूमिका बजावेल, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. बिहारमधल्या राजगीर इथं नालंदा विद्यापीठाच्या नव्या कॅम्पसच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. भारतीय शिक्षण आणि ज्ञान पद्धती मजबूत करुन भारत सुपर पावर बनू शकतो. जगाला भारताची ओळख आणि परंपरेचं दर्शन घडवण्यासाठी नालंदा विद्यापीठ हे उत्तम उदाहरण असल्याचं ते म्हणाले.   शिक्षणाच्या क्षेत्रात जागतिक भागिदारी यामुळं तयार होत असल्याचं परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर म्हणाले. जागतिक ...

June 17, 2024 7:28 PM

views 28

जातनिहाय जनगणना करण्याची मागणी प्रधानमंत्र्यांकडे करणार – मंत्री छगन भुजबळ

समता परिषदेची बैठक मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत आज मुंबईत झाली. जातनिहाय जनगणना करण्याची मागणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे करण्याविषयी या बैठकीत चर्चा झाल्याचं भुजबळ यांनी सांगितलं. जातिनिहाय जनगणना केल्यावर ओबीसींची स्थिती स्पष्ट होईल, त्यामुळे केंद्राकडून निधी मिळेल, असं भुजबळ म्हणाले. दरम्यान, शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव देऊन शेतकरी आंदोलनावर तोडगा काढावा अशी अपेक्षा भुजबळ यांनी व्यक्त केली. तसंच ओबीसी आंदोलकांना संयम बाळगण्याचं आवाहन केलं.