August 5, 2024 10:10 AM August 5, 2024 10:10 AM

views 2

देशात विक्रमी इंधन वायू उत्पादन, पंतप्रधानांकडून प्रशंसा

विकसित भारताचं उद्दीष्ट साध्य करण्याच्या दृष्टीनं उर्जा क्षेत्रातलं स्वावलंबन अतिशय महत्त्वाचं आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. देशानं इंधन वायू उत्पादनाच्या क्षेत्रात नवा उच्चांक गाठल्याचं पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी समाजमाध्यमावरील संदेशात नमूद केलं आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना पंतप्रधान मोदी यांनी विक्रमी वायू उत्पादनाबद्दल देशवासियांचं अभिनंदन केलं. हे विक्रमी उत्पादन विकसित भारत निर्मितीसाठी सरकार वचनबद्ध असल्याचा प्रत्यक्ष पुरावा असल्याचं त्यांनी या संदेशात म्...

August 4, 2024 2:53 PM August 4, 2024 2:53 PM

views 11

कृषी अर्थतज्ज्ञांच्या ३२व्या आंतरराष्ट्रीय परिषदेत परदेशी प्रतिनिधींकडून भारतातल्या कृषी क्षमतेची आणि कृषीक्षेत्रातल्या एकंदर यशोगाथेची प्रशंसा

नवी दिल्ली इथं आयोजित कृषी अर्थतज्ज्ञांच्या ३२व्या आंतरराष्ट्रीय परिषदेत उपस्थित असलेल्या परदेशी प्रतिनिधींनी भारतातल्या कृषी क्षमतेची आणि कृषीक्षेत्रातल्या एकंदर यशोगाथेची प्रशंसा केली आहे. या सहा दिवसीय परिषदेला ७५ देशांमधले कृषी अर्थतज्ञ उपस्थित असून त्यांनी  भारताच्या कृषिक्षेत्रातल्या कामगिरीचं आणि संशोधनाचं कौतुक केले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल या परिषदेचं उद्घाटन झालं. भारत अनेक कृषी उत्पादनांमधला अग्रणी उत्पादक आहे, भारताची वैविध्यपूर्ण जैवसंस्था आणि कृषी शिक्षणासाठ...

August 4, 2024 10:09 AM August 4, 2024 10:09 AM

views 9

देशातील अन्नधान्य विविधता जगासाठी आशेचा किरण असल्याचा पंतप्रधानांचा विश्वास, बत्तिसाव्या आंतरराष्ट्रीय कृषी अर्थतज्ञ परिषदेचा नवी दिल्लीत आरंभ

भारतात मुबलक अन्नधान्य उपलब्ध असून, जागतिक अन्न सुरक्षा आणि पोषण सुरक्षेबाबत तोडगा काढण्यात भारत महत्त्वाची भूमिका बजावत आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. नवी दिल्ली इथं आयोजित करण्यात आलेल्या 32 व्या आंतरराष्ट्रीय कृषी अर्थतज्ञ परिषदेचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झालं, त्या वेळी ते बोलत होते. यावर्षीच्या परिषदेची मध्यवर्ती संकल्पना ‘शाश्वत कृषी-अन्न प्रणालीच्या दिशेनं परिवर्तन’ अशी आहे. सरकार कृषी क्षेत्राच्या सक्षमीकरणासाठी विविध सुधारणा आणि उपाययोजना करत असून, शेतकऱ...

August 3, 2024 8:12 PM August 3, 2024 8:12 PM

views 3

जागतिक अन्न सुरक्षा आणि पोषण सुरक्षेबाबत तोडगा काढण्यात भारत महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं पंतप्रधानांचे प्रतिपादन

जागतिक अन्न सुरक्षा आणि पोषण सुरक्षेबाबत तोडगा काढण्यात भारत महत्त्वाची भूमिका बजावत आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. नवी दिल्ली इथं ३२व्या आंतरराष्ट्रीय कृषी अर्थतज्ञ परिषदेचं उद्घाटन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्या वेळी ते बोलत होते. सरकार कृषी क्षेत्रात विविध सुधारणा करत असून यामागे शेतकऱ्यांचं जीवनमान सुधारण्याचा हेतू आहे, सरकारच्या आर्थिक धोरणांच्या केंद्रस्थानी कृषिक्षेत्र आहे, असं ते म्हणाले. तृणधान्यं, दूध, डाळी आणि मसाल्यांचं सर्वात जास्त उत्पादन भारतात ...

July 26, 2024 9:58 AM July 26, 2024 9:58 AM

views 15

लेहमधील शिंकुनला बोगदा प्रकल्पाच्या कामाचा प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार प्रारंभ

लेहशी कोणत्याही हवामानात संपर्क कायम ठेवण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या, शिंकुन ला बोगदा प्रकल्पाचं काम आज सुरू होणार असल्याची माहितीही प्रधानमंत्र्यांनी दिली. हा चार किलोमीटर लांबीचा ट्विन ट्यूब बोगदा निमू-पदुम-दारचा रस्त्यावर सुमारे पंधरा हजार 800 फूट उंचीवर बांधण्यात येत आहे. हा जगातील सर्वात उंच बोगदा असेल. या बोगद्यामुळं सशस्त्र दलांना जलद हालचाल करणं शक्य होणार असून, लडाखमध्ये आर्थिक आणि सामाजिक विकासाला चालना देण्यासही मदत होणार आहे.

July 5, 2024 10:54 AM July 5, 2024 10:54 AM

views 43

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी २ दिवसांच्या रशिया दौऱ्यावर जाणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 8 आणि 9 जुलै ला रशिया दौऱ्यावर जात आहेत. रशियाचे राष्ट्रपती ब्लादीमीर पुतीन यांच्या निमंत्रणावरुंन पंतप्रधान मोदी या दौऱ्यावर जात असून ते मास्को इथ 22 व्या भारत रशिया वार्षिक शिखर बैठकीला उपस्थित राहणार आहेत. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये विविध प्रांतिक आणि वैश्विक मुददयांवर चर्चा होणार असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.   त्यानंतर 9 आणि 10 जुलै रोजी पंतप्रधान मोदी ऑस्ट्रिया देशाच्या दौऱ्यावर जाणार असून, गेल्या 41 वर्षात भारताचे पंतप्रधान प्रथमच या दे...

June 19, 2024 1:12 PM June 19, 2024 1:12 PM

views 8

प्रधानमंत्री मोदी यांनी कल्याणकारी काम केल्यानं तिसऱ्यांदा शपथ घेतली – राज्यमंत्री डॉ.एल मुरुगन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महिला, युवक आणि गरीबांच्या कल्याणासाठी भरीव काम केल्यानं सलग तिसऱ्यांदा शपथ घेतली, असं माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल मुरुगन यांनी सांगितलं. तामिळनाडूतल्या तिरुवन्नलमलाईमध्ये ते बातमीदारांशी बोलत होते.   नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्रीपदाची तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर सर्वात आधी त्यांनी शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधीचा सतरावा हप्ता वितरीत केल्यानं शेतकऱ्यांना मोठी आर्थिक मदत  झाल्याचं मुरुगन यांनी सांगितलं. या योजनेमुळे शेतकऱ्यांना शेतीच्...

June 19, 2024 8:49 PM June 19, 2024 8:49 PM

views 14

देशाला २०४७पर्यंत विकसित करण्यात ज्ञान महत्त्वाची भूमिका बजावेल – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

२०४७ पर्यंत देशाला विकसित करण्यात ज्ञान महत्त्वाची भूमिका बजावेल, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. बिहारमधल्या राजगीर इथं नालंदा विद्यापीठाच्या नव्या कॅम्पसच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. भारतीय शिक्षण आणि ज्ञान पद्धती मजबूत करुन भारत सुपर पावर बनू शकतो. जगाला भारताची ओळख आणि परंपरेचं दर्शन घडवण्यासाठी नालंदा विद्यापीठ हे उत्तम उदाहरण असल्याचं ते म्हणाले.   शिक्षणाच्या क्षेत्रात जागतिक भागिदारी यामुळं तयार होत असल्याचं परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर म्हणाले. जागतिक ...

June 17, 2024 7:28 PM June 17, 2024 7:28 PM

views 13

जातनिहाय जनगणना करण्याची मागणी प्रधानमंत्र्यांकडे करणार – मंत्री छगन भुजबळ

समता परिषदेची बैठक मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत आज मुंबईत झाली. जातनिहाय जनगणना करण्याची मागणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे करण्याविषयी या बैठकीत चर्चा झाल्याचं भुजबळ यांनी सांगितलं. जातिनिहाय जनगणना केल्यावर ओबीसींची स्थिती स्पष्ट होईल, त्यामुळे केंद्राकडून निधी मिळेल, असं भुजबळ म्हणाले. दरम्यान, शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव देऊन शेतकरी आंदोलनावर तोडगा काढावा अशी अपेक्षा भुजबळ यांनी व्यक्त केली. तसंच ओबीसी आंदोलकांना संयम बाळगण्याचं आवाहन केलं.