November 23, 2025 8:18 PM November 23, 2025 8:18 PM
44
तंत्रज्ञान हे मानवकेंद्रित, जागतिक आणि मुक्त स्रोतावर आधारित असायला हवं -प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
दक्षिण आफ्रिकेत जोहान्सबर्ग इथं सुरु असलेल्या जी ट्वेंटी नेत्यांच्या शिखर परिषदेचा आज समारोप झाला. या परिषदेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ‘सर्वांसाठी समन्यायी भविष्य - अत्यावश्यक खनिजे, योग्य काम आणि कृत्रिम बुद्धिमत्ता’ या संकल्पनेवर आधारित शिखर परिषदेच्या तिसऱ्या सत्रात सहभागी झाले आणि या सत्राला संबोधित केलं. तंत्रज्ञान हे मानवकेंद्रित, जागतिक आणि मुक्त स्रोतावर आधारित असायला हवं असं प्रतिपादन प्रधानमंत्र्यांनी यावेळी केलं. तंत्रज्ञानाच्या प्रचाराच्या पद्धतीत बदल करण्याची गरजही त्यांनी अधोरेखि...