June 6, 2025 8:25 PM June 6, 2025 8:25 PM
18
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी महिना अखेरीला कॅनडामध्ये होणाऱ्या जी-सेव्हन शिखर परिषदेला उपस्थित राहणार
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या महिन्याच्या अखेरीस कॅनडामध्ये होणाऱ्या जी- सेव्हन शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत. जी- सेव्हन शिखर परिषदेसाठी कॅनडाचे प्रधानमंत्री मार्क कार्नी यांनी आमंत्रित केल्याबद्दल प्रधानमंत्री मोदी यांनी त्यांचे आभार मानले आहेत. तसंच कार्नी यांना निवडणुकीत मिळालेल्या विजयाबद्दल त्यांनी समाजमाध्यमावर केलेल्या पोस्टमध्ये त्यांचं अभिनंदन केलं आहे. भारत आणि कॅनडामध्ये परस्पर आदर आणि हितसंबंधं असून दोन्ही देश नव्या जोमाने एकत्र काम करतील असं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे.