December 25, 2025 1:51 PM December 25, 2025 1:51 PM

views 5

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा खासदार क्रीडामहोत्सवातल्या खेळाडूंशी संवाद

संसद खेल महोत्सव देशाच्या उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावत असून खेळामुळे जय-पराजयाच्या पलीकडे जात तरुणांमधे खिलाडूवृत्ती रुजत असल्यामुळे सक्षम आणि शिस्तबद्ध तरूण घडत आहेत, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. संसद खेल महोत्सवाचं दूरस्थ पद्धतीने उद्घाटन केल्यानंतर ते आज बोलत होते. हेच तरूण पुढे राष्ट्र उभारणीत योगदान देणार आहेत, असं प्रधानमंत्री म्हणाले. संसद खेल महोत्सवामुळे देशाला हजारो खेळाडू मिळाले असून या महोत्सवाची व्याप्ती आणि प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे, असं प्रधानमंत्र...

December 19, 2025 1:32 PM December 19, 2025 1:32 PM

views 17

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते अनेक आयुष उपक्रमांचा प्रारंभ होणार

पारंपरिक औषधशास्त्रावर नवी दिल्लीत सुरू असलेल्या जागतिक आरोग्य संघटनेच्या आंतरराष्ट्रीय शिखर परिषदेचा आज समारोप होणार आहे. या समारोप समारंभात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनेक आयुष उपक्रमांचा प्रारंभ केला जाणार आहे. माय आयुष सर्वसमावेशक सेवा पोर्टल, आयुष मार्क या प्रमाणिकरणाचा यामधे समावेश आहे. या कार्यक्रमात२०२१ ते २०२५ या काळात योग प्रसार आणि विकासामध्ये उल्लेखनीय काम केलेल्या व्यक्तींना प्रधानमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार दिला जाणार आहे.  

December 15, 2025 7:22 PM December 15, 2025 7:22 PM

views 14

प्रधानमंत्री मोदी जॉर्डनची राजधानी अम्मान इथं पोहोचले

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज तीन देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात जॉर्डनची राजधानी अम्मान इथं पोहोचले. जॉर्डनचे प्रधानमंत्री जाफर हसन यांनी विमानतळावर त्यांचं स्वागत केलं. अम्मान इथल्या भारतीय समुदायानं केलेल्या स्वागताबद्दल प्रधानमंत्री मोदी यांनी समाजमाध्यमाद्वारे त्यांचे आभार मानले. जॉर्डनचे राजे अब्दुल्ला दुसरे इब्न अल हुसैन यांच्या निमंत्रणावरून ते जॉर्डनला भेट देत आहेत. यादरम्यान राजे अब्दुल्ला आणि प्रधानमंत्री जाफर हसन यांच्याशी प्रधानमंत्री मोदी सखोल द्विपक्षीय चर्चा करतील, तसंच जॉर...

December 9, 2025 9:55 AM December 9, 2025 9:55 AM

views 30

वंदे मातरम हे भारतीयांच्या संकटांशी सामना करण्याच्या ताकदीचं प्रतीक – प्रधानमंत्री

भारत आणि भारतीयांमध्ये प्रत्येक प्रश्न, प्रत्येक संकटाचा सामना करण्याची ताकद आहे, आणि वंदे मातरम् हे गीत त्या ताकदीचं प्रतीक आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल लोकसभेत केलं. 'वंदे मातरम्' या राष्ट्रीय गीताला दीडशे वर्षं पूर्ण झाल्यानिमित्त लोकसभेत एक विशेष चर्चा झाली, त्यावेळी मोदी बोलत होते. 'वंदे मातरम्' हे केवळ एक गीत नाही, तर ते भारतीयांच्या मनात वसलेलं समृद्ध भारताचं चित्र आहे, असं मोदी म्हणाले.   यावेळी प्रधानमंत्र्यांनी वंदे मातरमच्या दीडशे वर्षांच्या इतिहासाचा मा...

November 30, 2025 7:45 PM November 30, 2025 7:45 PM

views 9

संवेदनशीलता, प्रतिसाद देण्याची क्षमता आणि व्यावसायिकता वाढवून लोकांची पोलिसांबद्दलची धारणा बदलण्याची गरज – प्रधानमंत्री

संवेदनशीलता, प्रतिसाद देण्याची क्षमता आणि व्यावसायिकता वाढवून लोकांची पोलिसांबद्दलची धारणा बदलण्याची गरज असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. रायपूर इथं पोलीस महासंचालकांच्या ६० व्या अखिल भारतीय परिषदेत अध्यक्षस्थानावरून बोलत होते. नव्या फौजदारी कायद्यांबाबत जनजागृती करण्याची गरजही त्यांनी यावेळी व्यक्त केली. निर्जन बेटांना एकत्र जोडण्यासाठी नाविन्यपूर्ण धोरणं राबवा, NATGRID अंतर्गत एकत्रित केलेल्या डेटाबेसचा वापर करा, आणि कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करून या प्रणाली एकमेका...

November 28, 2025 1:19 PM November 28, 2025 1:19 PM

views 11

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कर्नाटक आणि गोवा दौऱ्यावर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज कर्नाटक आणि गोवा दौऱ्यावर आहेत. कर्नाटकात उडुपी इथल्या श्रीकृष्ण मठाला त्यांनी भेट दिली आणि पूजा अर्चना केली. गर्भगृहासमोरच्या सुवर्ण तीर्थ मंडपाचं उद्घाटन करुन नंतर त्यांनी संत कनकदास यांच्या  पवित्र खिडकीला सुवर्ण कवच अर्पण केलं. या खिडकीतून कनकदासांना भगवान कृष्णांचं दर्शन झालं होतं असं मानलं जातं. त्यानंतर आयोजित लक्ष कंठ गीता पठण कार्यक्रमात प्रधानमंत्री सहभागी झाले.    प्रधानमंत्री नंतर  गोव्याला जाणार असून  पर्तगळी इथं प्रभू श्री रामांच्या  ७७ फूट उंच कां...

November 27, 2025 1:36 PM November 27, 2025 1:36 PM

views 25

प्रधानमंत्री मोदी येत्या २९ नोव्हेंबरपासून छत्तीसगडच्या दौऱ्यावर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या २९ नोव्हेंबर पासून छत्तीसगडच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर असून ते पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षकांच्या साठाव्या अखिल भारतीय परिषदेत सहभागी होतील. या परिषदेत प्रधानमंत्र्यांच्या हस्ते पोलिसांना राष्ट्रपती पदकांचं वितरण होणार आहे. या तीन दिवसांच्या परिषदेचा उद्देश पोलिसांसमोरच्या प्रमुख आव्हानांना सामोरं जाताना झालेल्या प्रगतीचा आढावा घेणं आणि विकसित भारतासाठी देशाची सुरक्षितता सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने भविष्यकालीन रुपरेषा आखणं हा आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शह...

November 25, 2025 6:37 PM November 25, 2025 6:37 PM

views 8

गुरू तेग बहादूर यांच्या ३५०व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रधानमंत्री सहभागी

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज संध्याकाळी कुरुक्षेत्र इथं गुरू तेग बहादूर यांच्या  ३५०व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले. याप्रसंगी त्यांनी विशेष नाणं आणि टपाल तिकीटाचं अनावरण केलं. यावेळी हरियाणाचे राज्यपाल असीम कुमार घोष, मुख्यमंत्री नायबसिंह सैनी आणि हरियाणा शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जगदीश सिंग झिंडा उपस्थित होते.   त्याआधी प्रधानमंत्री मोदी यांनी भगवान श्रीकृष्णाच्या शंखाच्या सन्मानार्थ पांचजन्य इमारतीचंही आज उद्घाटन केलं. तसंच श्रीमद्‍भगवत गीतेच्या उगमाशी सं...

November 25, 2025 7:34 PM November 25, 2025 7:34 PM

views 61

अयोध्येतल्या श्रीराममंदिरात धर्मध्वजारोहण सोहळा प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीत संपन्न

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज अयोध्येमधल्या राम मंदिरावर धर्मध्वजारोहण झालं. राममंदिराचं बांधकाम पूर्ण झाल्यानिमित्त हे ध्वजारोहण करण्यात आलं आहे.   विवाह पंचमीच्या मुहुर्तावर होत असलेल्या धर्मध्वज सोहळ्यानिमित्त  देशभरातून हजारो भाविक अयोध्यानगरीत जमले असून सर्वत्र जय श्रीरामचा जयघोष आणि शंखध्वनी ऐकू येत आहे. यानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी अयोध्येत रोड शो केला आणि राम मंदिर परिसरातल्या विविध मंदिरांना भेट देऊन तिथे पूजा केली. प्रधानमंत्र्यानी सप्तमंदिर,...

November 24, 2025 1:05 PM November 24, 2025 1:05 PM

views 29

G20 शिखर परिषदेनंतर प्रधानमंत्री मोदी मायदेशी परतले

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दक्षिण आफ्रिकेचा दौरा यशस्वीपणे आटोपून आज मायदेशी परतले. जोहान्सबर्ग जी-20 शिखर परिषदेच्या यशस्वी आयोजनाचं मोदी यांनी कौतुक केलं असून, राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा यांचे आणि दक्षिण आफ्रिकेच्या सरकारचे आभार मानले आहेत. इथं विविध जागतिक नेत्यांशी झालेल्या बैठका आणि संवाद यशस्वी ठरले असून, त्यामुळं विविध देशांशी भारताचे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ होतील, असं त्यांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. या शिखर परिषदेचा काल समारोप झाला.    या परिषदेच्या तिसऱ्या सत्रात त्...