December 5, 2025 7:36 PM December 5, 2025 7:36 PM

views 21

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी करण्याची प्रक्रिया सुरू

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांच्या माहितीत विसंगती आढळून आल्याने संशयित कुटुंबांची आणि अल्पवयीन लाभार्थ्यांची पडताळणी करण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. एकाच कुटुंबातले एकापेक्षा अधिक सदस्य लाभार्थी असणं, चुकीची माहिती देऊन दिशाभूल करणं असे प्रकार घडल्याने अशा लाभार्थ्यांचे लाभ तात्पुरत्या स्वरुपात रोखण्यात आले आहेत. बीड जिल्ह्यामध्ये पाटोदा तालुक्यात ४३ संशयित लाभार्थी असून या सर्व प्रकरणांची तपासणी करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत.

November 18, 2025 1:03 PM November 18, 2025 1:03 PM

views 14

सौदी अरेबियात उमरा यात्रेसाठी गेलेल्या किमान ४५ भारतीयांचा बस अपघातात मृत्यू

सौदी अरेबियात मदिना जवळ बस आणि डिझेल टँकर यांच्यात धडक होऊन झालेल्या दुर्घटनेत 45 भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला असून केवळ 1 जण बचावला आहे.   मृतांमध्ये 17 पुरुष, 18 महिला आणि 10 बालकं आहेत. प्रत्येक मृत भारतीय नागरिकाच्या  कुटुंबियाला 5 लाख रुपये मदत म्हणून देणार असल्याचं तेलंगणा सरकारनं जाहीर केलं आहे. तेलंगणा सरकारचं एक प्रतिनिधी मंडळ सौदी अरेबियाला पाठवण्याचा निर्णयही राज्य सरकारनं घेतला आहे.

September 28, 2025 7:54 PM September 28, 2025 7:54 PM

views 164

सेवा पर्व या मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत प्रधानमंत्री पीएम किसान सन्मान निधी योजनेविषयी

देशाचा अन्नदाता असणाऱ्या शेतकऱ्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. याचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारने २०१८ ला प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची घोषणा केली. याची सुरवात २४ फेब्रुवारी २०१९ पासून झाली. तेव्हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले होते.... होल्ड बाईट मोदी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना देशातल्या सर्वात मोठ्या कल्याणकारी योजनांपैकी एक आहे. या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी दोन हजार रुपये दिले जातात. ही रक्कम थेट त्यांच्या बँक खात्य...

February 24, 2025 1:52 PM February 24, 2025 1:52 PM

views 18

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेला ६ वर्षे पूर्ण

देशातील शेतकऱ्यांना निधी आणि सन्मान देणाऱ्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेला सहा वर्षं पूर्ण झाल्याबद्द्ल प्रधानमंत्र्यांनी देशातल्या शेतकऱ्यांचं अभिनंदन केलं आहे. या योजनेतून आतापर्यंत साडेतीन लाख कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले याबद्द्ल प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमांवरच्या संदेशात समाधान व्यक्त केलं आहे.  गेल्या दहा वर्षात सरकारच्या प्रयत्नांमुळे कृषीक्षेत्राचा झपाट्याने विकास झाला. शेतीसाठीचा खर्च कमी झाला आणि उत्पन्न वाढलं असं त्यांनी या संदेशात म्हटलं आहे. दुसऱ्या एका संदेश...