August 29, 2025 3:29 PM August 29, 2025 3:29 PM
9
जपानी तंत्रज्ञान आणि भारताच्या प्रतिभेच्या एकात्मिकीकरण या शतकातल्या तंत्रज्ञान क्रांतीचं नेतृत्व करू शकते- प्रधानमंत्री
जपानी तंत्रज्ञान आणि भारताच्या प्रतिभेचं एकात्मिकीकरण या शतकातल्या तंत्रज्ञान क्रांतीचं नेतृत्व करू शकतं असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. प्रधानमंत्र्यांनी आज जपानची राजधानी टोकियो इथं भारत जपान आर्थिक मंचाला संबोधित केलं. भारत कृत्रिम बुद्धिमत्ता, सेमीकंडक्टर, क्वांटम कॉम्प्युटिंग, जैवतंत्रज्ञान आणि अंतराळ क्षेत्रात महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवत आहे, तसंच आता भारत आपल्या संरक्षण आणि अंतराळ क्षेत्रांनंतर, अणुऊर्जा क्षेत्रही खासगी क्षेत्रासाठी खुलं करणार असल्याचं त्यांनी सांग...