August 28, 2025 1:17 PM August 28, 2025 1:17 PM

views 7

प्रधानमंत्री जन धन योजनेला आज ११ वर्षे पूर्ण

प्रधानमंत्री जन धन योजनेला आज ११ वर्षे पूर्ण होत आहेत. १५ ऑगस्ट २०१४ ला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या उपक्रमाची सुरूवात केली होती. देशातल्या सर्व कुटुंबांना बँकिंग सेवा प्रदान करण्यासाठीची ही सर्वसमावेशक योजना आहे. या योजनेअंतर्गत ५६ कोटींहून अधिक खाती उघडण्यात आली असून, बँकिंग सेवा देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचल्या आहेत.