November 20, 2025 8:17 PM November 20, 2025 8:17 PM

views 12

प्रधानमंत्री गतीशक्ती योजनेअंतर्गत पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी बैठक

प्रधानमंत्री गतीशक्ती योजनेअंतर्गत पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं आज नेटवर्क प्लॅनिंग ग्रूपची बैठक बोलावली होती. लॉजिस्टिक्स, उद्योग प्रोत्साहन आणि अंतर्गत व्यापार  विभागाचे सहसचिव या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.    रस्ते, परिवहन आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाच्या रस्ते प्रकल्पांचं आणि दोन रेल्वे प्रकल्पांचं मूल्यमापन बैठकीत झालं. महाराष्ट्रात जुना पुणे नाक्यापासून ते राष्ट्रीय महामार्ग ६५वर सोलापुरातल्या बोरामणि नाक्यापर्यंत चारपदरी उन्नत कॉरि...

October 13, 2025 3:38 PM October 13, 2025 3:38 PM

views 11

पीएम गतिशक्ती योजनेमुळे नियोजन आणि सूक्ष्म स्तरावर अंमलबजावणी शक्य झाली- पियुष गोयल

पीएम गतिशक्ती योजनेमुळे मोठ्या प्रमाणावर नियोजन आणि सूक्ष्म स्तरावर अंमलबजावणी शक्य झाल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. या योजनेला  ४ वर्षं पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.   या योजनेमधून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची दूरदृष्टी दिसून येते असं ते म्हणाले. गेल्या ४ वर्षात पीएम गतीशक्ती विविध क्षेत्रात पोहोचली असल्याचं गोयल म्हणाले. यावेळी पीएम गतिशक्ती च्या ४ नवीन उपक्रमांचं उद्घाटन गोयल यांनी केलं.

October 13, 2025 2:52 PM October 13, 2025 2:52 PM

views 16

प्रधानमंत्री गतिशक्ती राष्ट्रीय योजनेला आज चार वर्षं पूर्ण

वाहतुकीच्या बहुस्तरीय  जोडणीसाठी सुरू केलेल्या प्रधानमंत्री गतिशक्ती राष्ट्रीय योजनेला आज चार वर्षं पूर्ण होत आहेत. विविध आर्थिक क्षेत्रांना बहुस्तरीय वाहतूक जोडणी उपलब्ध व्हावी यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी १३ ऑक्टोबर २०२१ ला या योजनेचं उद्घाटन केलं होतं.    लोकांना प्रवास करणं सुलभ व्हावं, वस्तू आणि सेवांची वाहतूक विनासायास व्हावी तसंच प्रवासाचा वेळ कमी व्हावा हे याचं उद्दिष्ट होतं. गतीशक्ती योजनेमुळे ५७ केंद्रीय मंत्रालयं तसंच राज्यं  आणि केंद्रशासित प्रदेशांना एकत्रित आणलं गेलं...

March 14, 2025 9:02 PM March 14, 2025 9:02 PM

views 12

PM Gati Shakti: बदलापूर-कर्जत रेल्वेमार्गासह विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांचा बैठकीत आढावा

प्रधानमंत्री गतिशक्ती अंतर्गत नेटवर्क प्लॅनिंग गटाच्या ८९ व्या बैठकीत आज रस्ते, रेल्वे आणि मेट्रो क्षेत्रातल्या प्रमुख पायाभूत सेवा प्रकल्पांचे मूल्यांकन करण्यात आले. यावेळी चार रस्ते, तीन रेल्वे आणि एक मेट्रो अशा एकूण आठ प्रकल्पांचे मूल्यांकन करण्यात आले.    यात बदलापूर - कर्जत दरम्यान तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्गिकेच्या कामाचा आढावा घेण्यात आलां. यामुळं मुंबई-पुणे-सोलापूर मार्गावरची प्रवासी आणि मालवाहतुकीची कोंडी दूर व्हायला मदत होईल. तसंच बदलापूर, माथेरान, कर्जतसारख्या भागात राहणाऱ्या...

October 15, 2024 8:24 PM October 15, 2024 8:24 PM

२७ आकांक्षित जिल्ह्यांसाठी प्रधानमंत्री गतीशक्ती राष्ट्रीय बृहत् आराखड्याच्या जिल्हा आवृत्तीचा प्रारंभ

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी आज नवी दिल्लीत २७ आकांक्षित जिल्ह्यांसाठी प्रधानमंत्री गतीशक्ती राष्ट्रीय बृहत् आराखड्याच्या जिल्हा आवृत्तीचा प्रारंभ केला. प्रधानमंत्री गतीशक्ती योजनेला तीन वर्ष पूर्ण झाली असून, पायाभूत सुविधांच्या नियोजनासाठी हे अतिशय उपयुक्त साधन ठरलं आहे, असं ते यावेळी म्हणाले. येत्या १८ महिन्यात जिल्हा बृहत् आराखड्याचा विस्तार ७५० पेक्षा जास्त जिल्ह्यांमधे केला जाईल, असं गोयल यांनी सांगितलं.