September 17, 2024 11:00 AM September 17, 2024 11:00 AM
8
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या भेटवस्तूंचा ई-लिलाव सुरू होणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या भेटवस्तूंचा ई-लिलाव आजपासून सुरू होणार आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी देशवासियांना ई-लिलावात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. या लिलावाद्वारे मिळणारा निधी नमामि गंगे योजनेसाठी वापरण्यात येणार आहे. यावर्षी लिलावाचा सहावा हप्ता असून सुरुवातीला 2019 मध्ये या प्रकारची सुरुवात करण्यात आली होती. लोक आजपासून आपल्या आवडत्या स्मृतिचिन्हासाठी बोली लावू शकतात. ऑनलाइन लिलाव 2 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे.