February 18, 2025 3:03 PM February 18, 2025 3:03 PM
5
पीएम-आशा योजना २०२५-२६ आर्थिक वर्षापर्यंत सुरू राहणार
१५व्या वित्त आयोगाच्या कालावधीत एकात्मिक प्रधानमंत्री अन्नदाता आय संरक्षण अभियान अर्थात पीएम-आशा योजना २०२५-२६ आर्थिक वर्षापर्यंत सुरू ठेवण्यास केंद्र सरकारनं मान्यता दिली आहे. या निर्णयासह, सरकारनं २०२४-२५ या खरेदी वर्षासाठी राज्याच्या उत्पादनाच्या १०० टक्के समतुल्य किंमत समर्थन योजनेअंतर्गत तूर, उडीद आणि मसूर डाळींच्या खरेदीलाही परवानगी दिली आहे. यामुळे डाळींचे देशांतर्गत उत्पादन वाढवण्यात आणि आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यात शेतकऱ्यांचं योगदान वाढण्यास मदत होणार आहे. २०२४-२५ च्या खरीप ह...