December 26, 2025 1:29 PM December 26, 2025 1:29 PM

views 20

केंद्र सरकार सर्वसामान्यांचं जीवन सुलभ करण्यासाठी वचनबद्ध – प्रधानमंत्री

केंद्र सरकार सर्वसामान्यांचं जीवनमान सुलभ करण्यासाठी वचनबद्ध असून येणाऱ्या काळात सुधारणा आणखी वेगाने होतील, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. समाज माध्यमावरच्या संदेशात मोदी म्हणाले की, सरत्या वर्षात आपल्या सरकारने केलेल्या सुधारणांमुळे प्रशासनातला बदल ठळकपणे दिसून आला.   या सुधारणा गुंतागुंत सोडवून त्याचा इच्छित परिणाम साध्य करण्यासाठी केल्या गेल्या होत्या. कररचनेचं सुलभीकरण, विवादांचं जलदगतीने निराकरण, आधुनिक कामगार संहिता यांमुळे संघर्ष कमी झाला. सरकारचा भर विश्वास, अनुमान ...

December 26, 2025 1:26 PM December 26, 2025 1:26 PM

views 18

सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या मुख्य सचिवांच्या राष्ट्रीय परिषदेला आज प्रारंभ

सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या मुख्य सचिवांची बैठक आज नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अध्यक्षतेखाली सुरु होत आहे.  तीन दिवस चालणाऱ्या या बैठकीला प्रधानमंत्री  उद्या आणि परवा संबोधित करतील. राष्ट्रीय विकासासाठी रचनात्मक आणि शाश्वत संवादाच्या माध्यमातून केंद्र आणि राज्याची भागीदारी मजबूत करण्यासाठी ही परिषद महत्त्वाची मानली जात आहे.   या वर्षी  या परिषदेचा मुख्य विषय 'विकसित भारतासाठी मानवी भांडवल' असा असून यात राज्यं आणि केंद्र शासित प्रदेशांसाठी सर्वोत्तम कार्यपद्धती आणि धोरण...

November 25, 2025 3:03 PM November 25, 2025 3:03 PM

views 10

प्रधानमंत्री कुरुक्षेत्र इथं गुरू तेग बहादूर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थित राहणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज संध्याकाळी कुरुक्षेत्र इथं गुरू तेग बहादूर यांच्या साडेतीनशेव्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी ते विशेष नाणं आणि टपाल तिकीटाचं अनावरण करणार आहेत. प्रधानमंत्री भगवान कृष्णाच्या शंखाच्या सन्मानार्थ पांचजन्य इमारतीचं उद्घाटन करणार आहेत.   त्यानंतर ते श्रीमद भगवत गीतेच्या उगमाशी संबंधित ब्रह्मसरोवर इथं पूजा करतील.  गुरू तेग बहादूर यांच्या साडेतीनशेव्या जयंतीनिमित्त या वर्षी वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत.

November 17, 2025 2:54 PM November 17, 2025 2:54 PM

views 17

प्रधानमंत्री तामिळनाडूमधील मेळाव्यात उपस्थित राहणार

तामिळनाडूमध्ये कोइम्बतूर इथं दक्षिण भारतीय जैविक कृषी महासंघातर्फे १९, २० आणि २१ नोव्हेंबरला मेळावा होणार आहे. यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत.    ते ५० कृषी शास्त्रज्ञांशी चर्चा करतील असं शेतकरी संघटनांचे समन्वयक पी आर पांडियन यांनी सांगितलं. या मेळाव्यात तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा, पद्दुचेरीसह इतर राज्यांमधून पाच हजारापेक्षा जास्त शेतकरी सहभागी होणार आहेत.

October 16, 2025 2:28 PM October 16, 2025 2:28 PM

views 21

प्रधानमंत्र्यांनी आंध्रप्रदेशातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला केलं अभिवादन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज आंध्रप्रदेशातील श्रीशैलम इथं श्री शिवाजी स्फुर्ती केंद्रम इथं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ध्यानस्थ मूर्तीला अभिवादन केलं.   यावेळी प्रधानमंत्र्यांनी श्री शिवाजी स्फुर्ती केंद्रामधल्या शिवाजी महाराज यांच्या इतिहासाची ओळख करून देणाऱ्या शिल्प, प्रतिमा आणि मूर्तींची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबु नायडू, पवन कल्याण उपस्थित होते. त्याआधी मोदी यांनी भ्रमरंबा मल्लिकार्जून स्वामी वरला देवस्थानमला भेट दिली.    प्रधानमं...

October 15, 2025 1:21 PM October 15, 2025 1:21 PM

views 52

प्रधानमंत्री आज करणार बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा प्रारंभ

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या प्रचाराचा प्रारंभ  भाजपचे ज्येष्ठ नेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज करणार आहेत. ‘मेरा बूथ सबसे मजबूत’ मोहिमेअंतर्गत ते बिहारमधे भाजपाच्या बूथ पातळीवरच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.   दरम्यान बिहार विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाने काल ७१ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. एनडीएचा आणखी एक मित्रपक्ष असलेल्या हिंदुस्तानी अवाम मोर्चा सेक्युलर या पक्षानेही ६ उमेदवारांची नावं जाहीर केली.   सीपीआय एम एल लिबरेशनने १८ उमेदवार...

October 15, 2025 10:16 AM October 15, 2025 10:16 AM

views 48

प्रधानमंत्री उद्या आंध्र प्रदेशला भेट देणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आंध्र प्रदेशला भेट देणार आहेत. या दौऱ्यात ते नंद्याल जिल्ह्यातल्या श्रीशैलम इथल्या श्री भ्रमरम्बा मल्लिकार्जुन स्वामी वरला देवस्थानम इथं पूजा करतील.   ते श्रीशैलममधील श्री शिवाजी स्फूर्ती केंद्रालाही भेट देणार आहेत. तसंच प्रधानमंत्र्यांच्या हस्ते कुर्नूलमध्ये सुमारे 13 हजार 430 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी करण्यात येणार आहे. या दौऱ्यात एका जाहीर सभेला देखील प्रधानमंत्री संबोधित करणार आहेत.

October 14, 2025 1:23 PM October 14, 2025 1:23 PM

views 44

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मंगोलियाचे अध्यक्ष उख्ना यांच्यात आज द्विपक्षीय चर्चा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज मंगोलियाचे राष्ट्राध्यक्ष खुरेलसुख उखना यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. या बैठकीत द्विपक्षीय संबंधांचा सविस्तर आढावा घेतला जाणार असून चर्चेनंतर काही सामंजस्य करारांवर स्वाक्षरी होणं अपेक्षित आहे.    सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि लोकशाही मूल्यांमधील समानतेमुळे १९५५ पासून गेली ७० वर्ष भारत आणि मंगोलिया यांच्यात बहुस्तरीय घनिष्ठ भागीदारी प्रस्थापित झाली आहे. प्रथमच भारत भेटीवर आलेले मंगोलियाचे अध्यक्ष आज संध्याकाळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना भेटणार आहेत.  ...

October 12, 2025 9:26 AM October 12, 2025 9:26 AM

views 54

पीएम धनधान्य कृषी योजना आणि डाळ उत्पादनात आत्मनिर्भरता मोहिमेला प्रधानमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ

प्रधानमंत्री धन धान्य कृषी योजना आणि डाळींमध्ये आत्मनिर्भरता मोहीम देशातील लाखो शेतकऱ्यांचं भविष्य बदलतील असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल व्यक्त केला. पीएम धनधान्य कृषी योजना आणि डाळ उत्पादनात आत्मनिर्भरता मोहिमेसह ४२ हजार कोटी रुपये खर्चाच्या कृषी योजनांचा प्रारंभ काल पंतप्रधानांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते. देशात विविध ठिकाणी झालेल्या या कार्यक्रमांत शेतकरी दूरस्थ पद्धतीनंसहभागी झाले होते. या योजना आत्मनिर्भरता, ग्रामविकास आणि कृषी नवोपक्रमाच्या नवीन युगाची सुरुवात आहेत;...

September 20, 2025 9:42 AM September 20, 2025 9:42 AM

views 34

प्रधानमंत्री गुजरात दौऱ्यावर, ‘समुद्र से समृद्धी’ उपक्रमाअंतर्गत विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घटान करणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज गुजरातच्या एक दिवसाच्या दौऱ्यावर आहेत. ते भावनगर इथं समुद्रक्षेत्राशी संबंधित 'समुद्र से समृद्धी' या कार्यक्रमात सहभागी होतील आणि 34 हजार 200 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. यामध्ये सागरी प्रकल्प, एलएनजी पायाभूत सुविधा, अक्षय ऊर्जा, महामार्ग, आरोग्यसेवा आणि शहरी वाहतूक यासह अनेक क्षेत्रांचा समावेश आहे.   मुंबईतील नवीन क्रूझ टर्मिनल, कोलकाता आणि पारादीप इथं बंदरांवर नवीन कंटेनर सुविधा आणि दीनदयाळ बंदरावर हरित ज...