January 30, 2025 8:53 PM January 30, 2025 8:53 PM

views 9

अमेरिकेत झालेल्या विमान दुर्घटनेत २८ जणांचा मृत्यू

अमेरिकेत, विमान आणि हेलिकॉप्टरची टक्कर होऊन झालेल्या दुर्घटनेत  किमान २८ जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकन एअरलाइन्सचं हे विमान रोनाल्ड रीगन राष्ट्रीय विमानतळाकडे  येत असताना हवेतच त्याची हेलिकॉप्टरशी टक्कर झाली. या विमानात 60 प्रवासी आणि चार कर्मचारी, तर हेलिकॉप्टरमध्ये तीन सैनिक होते. शोधकार्य सुरु असून वॉशिंग्टन डीसीतल्या पोटोमॅक नदीतून किमान 30 मृतदेह हाती लागले आहेत. इतरांचा शोध घेण्यासाठी 300 कर्मचारी काम करत आहेत.

December 30, 2024 1:31 PM December 30, 2024 1:31 PM

views 11

दक्षिण कोरियातला विमान अपघात पक्ष्यामुळे झाल्याची माहिती

दक्षिण कोरियातला विमान अपघात पक्ष्यामुळे झाल्याची माहिती मिळत आहे. अपघाताच्या काही मिनिटांपूर्वी विमानाला पक्ष्याची धडक बसू शकते, असा इशारा विमान नियंत्रकांनी दिला होता, अशी माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली आहे. अपघातातून वाचलेल्या कर्मचाऱ्यांपैकी एकानेही पक्ष्याची धडक बसल्याचा उल्लेख केला होता. मात्र, तरीही या अपघातामागच्या मूळ कारणाचा शोध अधिकारी घेत आहेत. या अपघातात आतापर्यंत १७९ जणांचा मृत्यू झाला आहे. यात १७५ प्रवासी आणि ४ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. 

December 29, 2024 7:48 PM December 29, 2024 7:48 PM

views 11

दक्षिण कोरियामधे विमान अपघातात १७९ जणांचा मृत्यू

दक्षिण कोरियात प्रवासी विमानाला झालेल्या अपघातात १७९ जणांचा मृत्यू दक्षिण कोरियात आज सकाळी प्रवासी विमानाला झालेल्या अपघातात १७९ जणांचा मृत्यू झाला. त्यात १७५ प्रवासी आणि ४ विमान कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. फक्त दोन कर्मचारी वाचले आहेत. बँकॉकहून निघालेलं हे विमान मुआन इथल्या विमानतळावर उतरताना लँडिंग गिअरमध्ये बिघाड झाल्यामुळे भिंतीवर कोसळलं आणि त्याला आग लागल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. या दुर्घटनेनंतर, मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावरची सर्व उड्डाणं रद्द करण्यात आल्याचं कोरियाच्या विमानतळ ...

December 23, 2024 1:21 PM December 23, 2024 1:21 PM

views 12

ब्राझीलमध्ये पर्यटनस्थळावर विमान कोसळून झालेल्या अपघातात १० जणांचा मृत्यू

ब्राझीलमध्ये काल ग्रामाडो शहरातल्या एका पर्यटनस्थळावर एक विमान कोसळून अपघात झाला. या अपघातात विमानाच्या पायलटसह सर्व १० जणांचा मृत्यू झाला आणि १२ हून अधिकजण जखमी झाले. ट्विन-इंजिन असलेलं पायपर पी.ए-४२ चेयेन हे विमान उड्डाणानंतर लगेचच एका घराच्या दुसऱ्या मजल्यावर कोसळले आणि नंतर शेजारच्या फर्निचरच्या दुकानावर आदळलं, असं ब्राझीलच्या नागरी संरक्षण संस्थेनं म्हटलं आहे.