August 11, 2024 9:47 AM August 11, 2024 9:47 AM

views 12

हिरे आयातविषयक परवान्याची उद्योगमंत्री पियूष गोयल यांची घोषणा

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियूष गोयल यांनी काल डायमंड इंपरेस्ट लायसन्स म्हणजे हिरे आयातविषयक परवान्याची घोषणा केली. रत्ने आणि दागिने निर्यात प्रोत्साहन परिषदेनं आयोजित केलेल्या भारत आंतरराष्ट्रीय दागिने प्रदर्शनात एका मुलाखतीत ते बोलत होते. या परवान्यामुळे छोट्या आणि मध्यम उद्योजकांना लाभ होईल असं गोयल म्हणाले. या परवान्यामुळे विशिष्ट उलाढालीचे निकष पूर्ण करणाऱ्या हिरे निर्यातदारांना आधीच्या तीन वर्षांच्या निर्यातीच्या सरासरीच्या पाच टक्क्यांपर्यंत आयात करता येणार आहे. त्यामुळे छोट्या आण...

August 10, 2024 7:31 PM August 10, 2024 7:31 PM

मुंबईत केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय दागिने प्रदर्शनाचं उद्घाटन

भारतातल्या सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग निर्यातीत रत्ने आणि दागिने निर्यातीचा मोठा वाटा असून हिरे उत्तेजना परवाना सुरु केल्यामुळे या उद्योगांना लाभ मिळणार असल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं आहे. ते आज मुंबईत भारत आंतरराष्ट्रीय दागिने प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभात बोलत होते. निर्यातीला चालना मिळण्यासाठी आपलं मंत्रालय मुक्त व्यापार करारांवर स्वाक्षऱ्या करण्याची प्रक्रिया वेगाने पार पाडत असल्याची माहिती त्यांनी दिली. याबाबत, युरोपीय संघ आणि इंग्लंड सोबत चर्चा पु...

July 30, 2024 1:05 PM July 30, 2024 1:05 PM

views 18

रालोआ सरकार अर्थव्यवस्थेची स्थिती हाताळण्यात ठरलं अपयशी – पियूष गोयल

राष्ट्रीय लोकशाही आघाडीने सत्तेवर आल्यानंतर देशाच्या कमकुवत अर्थव्यवस्थेला जगातल्या पहिल्या पाच अर्थव्यवस्थांच्या रांगेत नेऊन बसवलं, असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी सांगितलं. रालोआ सरकार अर्थव्यवस्थेची स्थिती हाताळण्यात अपयशी ठरलं आहे, या लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपाला उत्तर देताना गोयल नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते.   संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात महागाई दर गगनाला भिडल्यामुळे अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर ४ पूर्णांक ४ दशांश ट...